१२ जुलाई दिनविशेष
१२ जुलै दिनविशेष
द्वारे स्वाती खंदारे | प्रकाशक संपादक मंडळ | १२ जुलै २०१३
१२ जुलै दिनविशेष(July 12 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर : जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर (जुलै १२, १८६४ - जानेवारी ५, १९४३) हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होते. गुलामगीरीच्या काळात जन्माला आलेले कार्व्हर यांना त्यांचे मालक मोझेस कार्व्हर यांनी मोठे केले व आपले नावही दिले. गुलामगीरी नष्ट झाल्यानंतर कृष्णवर्णीयांना शिक्षणाची दारे खुली झाली होती. चित्रकला, गायन व अनेक कलेत निपुण असलेल्या कार्व्हर यांना त्यांच्या आयुष्यात अनेक हितचिंतकांनी उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले
जागतिक दिवस
- स्वातंत्र्य दिन : किरिबाटी, साओ टोमे व प्रिन्सिप.
ठळक घटना, घडामोडी
- ११९१ : तिसरी क्रुसेड - दोन वर्षांच्या वेढ्यानंतर एकरचा किल्ला पडला.
- १५८० : ऑस्ट्रोग बायबलचे प्रकाशन.
- १६९१ : ऑघ्रिमची लढाई - इंग्लंडच्या विल्यम दुसर्याने स्कॉटलंडच्या जेम्स सातव्याला हरवले.
- १८१२ : १८१२चे युद्ध - अमेरिकेने कॅनडावर आक्रमण केले.
- १८९२ : मॉँट ब्लांक पर्वतावरील सरोवर फुटले. खालील सेंट जर्व्हे गावात पूर. २०० ठार.
- १९३२ : हेडली व्हेरिटीने एकाच डावात १० धावा देउन १० बळी घेतले व क्रिकेटमधील उच्चांक स्थापित केला.
- १९३३ : अमेरिकन काँग्रेसने कामगारांसाठी न्यूनतम मोबदला ताशी ३३ सेंट ठरवला.
- १९४३ : दुसरे महायुद्ध - प्रोखोरोव्ह्काची लढाई.
- १९५० : रेने प्लेव्हेन फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९६७ : नुवार्क, न्यु जर्सी शहरात वांशिक दंगली. २७ ठार.
- १९७५ : साओ टोमे व प्रिन्सिपला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
- १९७९ : किरिबाटीला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९९३ : जपानच्या होक्काइदो द्वीपावर रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ तीव्रतेचा भूकंप. यामुळे तयार झालेल्या त्सुनामीने ओकुशिरी द्वीपावर २०२ बळी घेतले.
- २००४ : पेद्रो संताना लोपेस पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी.
- २००५ : आल्बर्ट दुसरा मोनॅकोच्या राजेपदी.
- २०१२ : नायजेरियातील ओकोबी शहराजवळ अपघात झालेल्या पेट्रोलवाहू ट्रकचा स्फोट. त्यातून गळत असलेले पेट्रोल गोळा करणारऱ्यांपैकी १२१ व्यक्ती ठार, शेकडो जखमी.
जन्म, वाढदिवस
- १०० : जुलियस सीझर, रोमन सेनापती व राज्यकर्ता, सीझर (जुलै १२ किंवा जुलै १३).
- १३९४ : अशिकागा योशिनोरी, जपानी शोगन.
- १५९६ : मायकेल पहिला, रशियाचा झार.
- १८५२ : हिपोलितो य्रिगोयेन, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
- १८५४ : जॉर्ज ईस्टमन, अमेरिकन संशोधक.
- १८६४ : इतिहासाचार्य वि.का.राजवाडे, मराठी इतिहास संशोधक
- १८६४ : जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर, अमेरिकन शास्त्रज्ञ.
- १८७० : लुई दुसरा, मोनॅकोचा राजा.
- १९२० : यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश.
- १९३७ : लायोनेल जॉस्पिन, फ्रांसचा पंतप्रधान.
- १९४३ : ब्रुस टेलर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४७ : पूचिया कृष्णमुर्ती, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६५ : संजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६९ : ऍलन मुल्लाली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- १४४१ : अशिकागा योशिनोरी, जपानी शोगन.
- १७१२ : रिचर्ड क्रॉमवेल, इंग्लिश राज्यकर्ता.
- १९४९ : डग्लस हाइड, आयर्लंडचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
चकवा
माणसाला नेहेमी पुर्वसुचना मिळत असतात. कधी आपल्या मनाकडुन तर कधी निसर्गाकडुन, पण बहुतांश लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि गोत्यात येतात.
- नवीन लेखन
- लोकप्रिय लेखन
- वाचकांचे अभिप्राय
पावसाळा नव्याने
विभाग मराठी कविता
आम्ही नोकरीवाल्या
विभाग मराठी लेख
तू तर उत्कट उल्का
विभाग मराठी कविता
उत्कृष्ट दहा
Legal - No Part of this Website, Including photocopy is permitted to copy or translate in any language, without prior permission in writing.
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
No comments:
Post a Comment