26th JULY
२६ जुलै दिनविशेष
द्वारे स्वाती खंदारे | प्रकाशक संपादक मंडळ | २६ जुलै २०१३
२६ जुलै दिनविशेष(July 26 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
कारगिल युद्ध - कारगीलचे युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगील व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगीलचे युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगील व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले.
जागतिक दिवस
- राष्ट्रीय क्रांती दिन : क्युबा.
- स्वातंत्र्य दिन : लायबेरिया, मालदीव.
- विजय दिन : भारत (कारगिल युद्धाची समाप्ती).
ठळक घटना, घडामोडी
- ११३९ : अफोन्सो पहिला पोर्तुगालच्या राजेपदी.
- १७८८ : न्यू यॉर्कने अमेरिकेचे संविधान मान्य केले व त्यायोगे अमेरिकेचे ११वे राज्य झाले.
- १८४७ : लायबेरियाला स्वातंत्र्य.
- १९३६ : जर्मनी व इतर मित्र देशांचा स्पॅनिश गृहयुद्धात हस्तक्षेप.
- १९४१ : दुसरे महायुद्ध - जपानच्या नैऋत्य एशियातील शिरकावास प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टने अमेरिकेतील जपानी मालमत्ता सरकारी ताब्यात घेण्याचा आदेश दिला.
- १९४५ : युनायटेड किंग्डममधील निवडणुकांत लेबर पार्टीचा विजय. विन्स्टन चर्चिलने पंतप्रधानपदाचा राजनामा दिला.
- १९४७ : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने सी.आय.ए., संरक्षणखाते व राष्ट्रीय सुरक्षा समितीची स्थापना केली.
- १९४८ : हॅरी ट्रुमनने अमेरिकन सैन्यातील वंशभेद नियमबाह्य ठरवला.
- १९४८ : आंद्रे मरी फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९५३ : क्युबन क्रांतीला सुरुवात.
- १९५३ : अमेरिकेच्या अॅरिझोना राज्यात मोर्मोन पंथाच्या फंडामेंटालिस्ट चर्च ऑफ जिझस क्राइस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स या बहुपत्नीत्त्व पाळणार्या मूलतत्त्ववादी उपपंथावर कार्रवाई.
- १९५६ : जागतिक बँकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तच्या राष्ट्राध्यक्ष गमाल नासरने सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.
- १९५७ : ग्वाटेमालाच्या हुकुमशहा कार्लोस कॅस्टियो अर्मासची हत्या.
- १९५८ : अमेरिकेने एक्स्प्लोरर ४ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
- १९६३ : सिनकॉम २ या पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.
- १९६३ : युगोस्लाव्हियातील स्कोप्ये शहरात भूकंप. १,१०० ठार.
- १९६५ : मालदीवला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७१ : अमेरिकेच्या अपोलो १५ अंतराळयानाचे प्रक्षेपण.
- २००५ : मुंबई व परिसरात २४ तासात जवळजवळ १ मीटर (९९५ मिलीमीटर) पाउस. महापूरात शेकडो मृत्युमुखी.
- २०११ : मोरोक्कोमध्ये सी.१३० प्रकारचे विमान कोसळले. ७८ ठार.
जन्म, वाढदिवस
- १८७४ : शाहू महाराज, समाज सुधारक.
- १०३० : संत स्टानिस्लॉ.
- १६७८ : जोसेफ पहिला, पवित्र रोमन सम्राट.
- १८०२ : मेरियानो अरिस्ता, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
- १८५६ : जॉर्ज बर्नार्ड शॉ, आयरिश लेखक.
- १८५८ : टॉम गॅरेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८७५ : कार्ल युंग, स्विस मनोवैज्ञानिक.
- १९०८ : साल्व्हादोर अलेंदे, चिलीचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२७ : जी.एस. रामचंद, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२८ : फ्रांसिस्को कॉसिगा, इटालियन प्रजासत्ताकचा ८वा राष्ट्राध्यक्ष.
- १९२८ : स्टॅन्ली कुब्रिक, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
- १९३९ : जॉन हॉवर्ड, ऑस्ट्रेलियाचा २५वा पंतप्रधान.
- १९४२ : व्लादिमिर मेचियार, स्लोव्हेकियाचा पंतप्रधान.
- १९४३ : मिक जॅगर, इंग्लिश संगीतकार, गायक.
- १९४९ : थक्शिन शिनावत्र, थायलंडचा पंतप्रधान.
- १९६९ : जॉँटी र्होड्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७१ : खालेद महमुद, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- ७९६ : ऑफा, मर्शियाचा राजा.
- ८११ : निसेफोरस, बायझेन्टाईन सम्राट.
- १३८० : कोम्यो, जपानी सम्राट.
- १४७१ : पोप पॉल दुसरा.
- १८४३ : सॅम ह्युस्टन, टेक्सासच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
- १८६७ : ओट्टो, ग्रीसचा राजा.
- १९५२ : एव्हा पेरोन, आर्जेन्टिनाची गायिका.
- २००९ : भास्कर चंदावरकर, मराठी संगीतकार.
YOU MAY LIKE
चकवा
माणसाला नेहेमी पुर्वसुचना मिळत असतात. कधी आपल्या मनाकडुन तर कधी निसर्गाकडुन, पण बहुतांश लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि गोत्यात येतात.
- नवीन लेखन
- लोकप्रिय लेखन
- वाचकांचे अभिप्राय
पाऊस
विभाग मराठी कविता
स्त्रीशक्ती
विभाग मराठी कविता
पावसाळा नव्याने
विभाग मराठी कविता
आम्ही नोकरीवाल्या
विभाग मराठी लेख
उपयुक्त दुवे
Legal - No Part of this Website, Including photocopy is permitted to copy or translate in any language, without prior permission in writing.
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
No comments:
Post a Comment