18th JULY
१८ जुलै दिनविशेष
द्वारे स्वाती खंदारे | प्रकाशक संपादक मंडळ | १८ जुलै २०१३
१८ जुलै दिनविशेष(July 18 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
नेल्सन मंडेला : (१९१८ जुलै १८ - २०१३ डिसेंबर ५ ) १९९४ ते १९९९ पासून दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष होते. दक्षिण आफ्रिकेच्या विरोधी वर्णद्वेषाचे किंवा वर्णभेदाचे धोरण क्रांतिकारक राजकारणी आणि परदुःख दूर करण्यासाठी झटणारे मनुष्य होते .
जागतिक दिवस
- संविधान दिन : उरुग्वे.
ठळक घटना, घडामोडी
- ३९० : अलियाची लढाई - गॉल सैन्याने रोमजवळ रोमन सैन्याचा पराभव केला व नंतर रोममध्ये घुसून शहराची नासाडी केली.
- ६४ : रोममध्ये प्रचंड आग. जवळजवळ सगळे शहर भस्मसात. यादरम्यान सम्राट निरो लांब उभा राहुन आपले तुणतुणे वाजवत असल्याची कथा.
- १२१६ : ऑनरियस तिसरा पोपपदी.
- १५३६ : इंग्लंडमध्ये पोपची सद्दी संपल्याचा फतवा.
- १८३० : उरुग्वेने आपले पहिले संविधान अंगिकारले.
- १८६३ : अमेरिकन यादवी युद्ध-फोर्ट वॅग्नरची लढाई - श्यामवर्णीय सैनिकांचा युद्धात सर्वप्रथम सहभाग. ५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंटच्या झेंड्याखाली फोर्ट वॅग्नरवरील हल्ला असफल, परंतु या लढाईत श्यामवर्णीय सैनिकांची बहादुरी व धडाडी अमेरिकन लोकांना दिसली.
- १८५२ : इंग्लंडने निवडणुकांत गुप्त मतदान अंगिकारले.
- १८७३ : ऑस्कार दुसरा नॉर्वेच्या राजेपदी.
- १८९८ : मेरी क्युरी व पिएर क्युरीनी पोलोनियम या नवीन मूलतत्त्वाचा शोध लावला.
- १९२५ : ऍडोल्फ हिटलरने माइन कॅम्फ हे आत्मकथेसदृश पुस्तक प्रकाशित केले.
- १९४४ : जपानच्या पंतप्रधान हिदेकी तोजोने राजीनामा दिला.
- १९६५ : सोवियेत संघाच्या झॉँड ३ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
- १९६६ : अमेरिकेच्या जेमिनी १० या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
- १९६८ : इंटेल कंपनीची स्थापना.
- १९६९ : अमेरिकेन सेनेटर एडवर्ड केनेडीच्या गाडीला अपघात. सहप्रवासी ठार. ही घटना केनेडीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीतील प्रमुख अडसर होती.
- १९७६ : ऑलिंपिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवले.
- १९७७ : व्हियेतनामला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- १९८२ : प्लान दि सांचेझची कत्तल - ग्वाटेमालात २६८ खेड्यातील लोकांची हत्या.
- १९८४ : सान इसिद्रोची कत्तल - कॅलिफोर्नियातील सान इसिद्रो गावातील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मध्ये २१ लोकांची हत्या. खून्याला पोलिसांनी मारले.
- १९९४ : बोयनोस एर्समध्ये इमारतीत स्फोट. ८५ ठार.
- १९९५ : कॅरिबिअन समुद्रातील माँतसेरात द्वीपावरील सुफ्रीयेर ज्वालामुखीचा उद्रेक. राजधानी प्लिमथ उद्ध्वस्त.
- १९९६ : कॅनडात साग्वेने नदीला प्रचंड पूर.
- १९९८ : पापुआ न्यू गिनीत त्सुनामीसदृश समुद्री लाटेत ३,००० व्यक्ती मृत्युमुखी.
- २००१ : अमेरिकेच्या बाल्टिमोर शहरातील बोगद्यात रेल्वे गाडी रुळांवरुन घसरली व पेटली. शहराचा मध्यवर्ती भाग बंद करावा लागला.
- २०१३ : अमेरिकेच्या डेट्रॉइट शहराच्या महानगरपालिकेने २० अब्ज अमेरिकन डॉलर (१२ निखर्व रुपये) इतके कर्ज फेडण्याची क्षमता नसल्याचे जाहीर करुन दिवाळे जाहीर केले.
जन्म, वाढदिवस
- १५५२ : रुडॉल्फ दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १८११ : विल्यम मेकपीस थॅकरे, इंग्लिश लेखक.
- १८४८ : डब्ल्यु.जी. ग्रेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९० : फ्रँक फोर्ड, ऑस्ट्रेलियाचा १५वा पंतप्रधान.
- १९०९ : आंद्रेइ ग्रोमिको, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९०९ : मोहम्मद दाउद खान, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१८ : नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२१ : जॉन ग्लेन, अमेरिकन अंतराळवीर.
- १९४९ : डेनिस लिली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५० : सर रिचर्ड ब्रॅन्सन, इंग्लिश उद्योगपती.
- १९६७ : व्हिन डीझेल, अमेरिकन अभिनेता.
- १९८२ : प्रियांका चोप्रा, भारतीय अभिनेत्री.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- १६२३ : पोप ग्रेगोरी पंधरावा.
- १८६३ : रॉबर्ट गुल्ड शॉ, अमेरिकेच्या ५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंटचा सेनापती.
- १८७२ : बेनितो हुआरेझ, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
- १८९२ : थॉमस कूक, इंग्लिश प्रवास-व्यवस्थापक.
- १९९० : यून बॉसिऑन, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- २०१२ : राजेश खन्ना, हिंदी चित्रपट अभिनेते.
YOU MAY LIKE
चकवा
माणसाला नेहेमी पुर्वसुचना मिळत असतात. कधी आपल्या मनाकडुन तर कधी निसर्गाकडुन, पण बहुतांश लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि गोत्यात येतात.
- नवीन लेखन
- लोकप्रिय लेखन
- वाचकांचे अभिप्राय
पाऊस
विभाग मराठी कविता
स्त्रीशक्ती
विभाग मराठी कविता
पावसाळा नव्याने
विभाग मराठी कविता
आम्ही नोकरीवाल्या
विभाग मराठी लेख
उत्कृष्ट दहा
Legal - No Part of this Website, Including photocopy is permitted to copy or translate in any language, without prior permission in writing.
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
No comments:
Post a Comment