22nd JULY
२२ जुलै दिनविशेष
द्वारे स्वाती खंदारे | प्रकाशक संपादक मंडळ | २२ जुलै २०१३
२२ जुलै दिनविशेष(July 22 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
मुकेश : (२२ जुलै १९२३ - २७ ऑगस्ट १९७६) हे लोकप्रिय हिंदी भाषा चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक होते.
जागतिक दिवस
- पाय दिन. (२२/७ = पाय)
ठळक घटना, घडामोडी
- १७९३ : अलेक्झांडर मॅकेंझी मेक्सिको पार करून पॅसिफिक तटावर पोचणारा पहिला युरोपीय झाला.
- १८१२ : सालामांकाची लढाई - आर्थर वेलेस्ली, ड्युक ऑफ वेलिंग्टनने सालामांका, स्पेन येथे फ्रेंच सैन्याला हरवले.
- १९१६ : सान फ्रांसिस्कोमध्ये ध्वजसंचलनाचे वेळी बॉम्बस्फोट. १० ठार, ४० जखमी.
- १९३३ : वायली पोस्टने ७ दिवस १८ तास ४५ मिनिटांत विमानातून सर्वप्रथम पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
- १९४२ : दुसरे महायुद्ध - अमेरिकेत पेट्रोलचे रेशनिंग सुरू करावे लागले.
- १९४२ : ज्यूंचे शिरकाण - वॉर्सोतून ज्यूंना तडीपार करणे सुरू झाले.
- १९४३ : दोस्त राष्ट्रांनी इटलीचे पालेर्मो शहर जिंकले.
- १९४६ : इर्गुन या दहशतवादी संघटनेने जेरुसलेममधील ब्रिटिश मुख्यालयावर बॉम्बहल्ला चढवला. ९० ठार.
- २००३ : अमेरिकन सैन्याच्या १०१व्या हवाई तुकडीने इराकमध्ये सद्दाम हुसेनची मुले उदय हुसेन व कुसे हुसेनना ठार मारले.
जन्म, वाढदिवस
- १८८७ : गुस्ताव लुडविग हेर्ट्झ, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९१८ : गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार.
- १९२३ : मुकेश, पार्श्वगायक.
- १९२३ : बॉब डोल, अमेरिकेचा सेनेटर.
- १९३७ : वसंत रांजणे, भारताचा कसोटी क्रिकेट खेळाडू.
- १९७० : देवेंद्र गंगाधर फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे आमदार व महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- १४६१ : चार्ल्स सातवा, फ्रांसचा राजा.
- १५४० : जॉन झापोल्या, हंगेरीचा राजा.
- १६७६ : पोप क्लेमेंट दहावा.
- १८२६ : ज्युसेप्पे पियाझी, इटालियन खगोलशास्त्रज्ञ.
- १८३२ : नेपोलियन दुसरा, फ्रांसचा राजा.
- १९१८ : ईंद्रलाल रॉय, भारतीय वैमानिक.
- १९५० : विल्यम ल्यॉन मॅकेन्झी किंग, कॅनडाचा १०वा पंतप्रधान.
- १९५८ : मिखाइल झोश्चेन्को, रशियन लेखक.
- २००३ : उदय हुसेन, सद्दाम हुसेनचा मुलगा.
- २००३ : कुसे हुसेन, सद्दाम हुसेनचा मुलगा.
YOU MAY LIKE
चकवा
माणसाला नेहेमी पुर्वसुचना मिळत असतात. कधी आपल्या मनाकडुन तर कधी निसर्गाकडुन, पण बहुतांश लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि गोत्यात येतात.
- नवीन लेखन
- लोकप्रिय लेखन
- वाचकांचे अभिप्राय
पाऊस
विभाग मराठी कविता
स्त्रीशक्ती
विभाग मराठी कविता
पावसाळा नव्याने
विभाग मराठी कविता
आम्ही नोकरीवाल्या
विभाग मराठी लेख
FROM THE WEB
उत्कृष्ट दहा
Legal - No Part of this Website, Including photocopy is permitted to copy or translate in any language, without prior permission in writing.
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
No comments:
Post a Comment