Wednesday 29 July 2015

28th JULY 

२८ जुलै दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | २८ जुलै २०१३
२८ जुलै दिनविशेष(July 28 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
- -

जागतिक दिवस

  • स्वातंत्र्य दिन : पेरू

ठळक घटना, घडामोडी

  • १४९३ : मॉस्को शहराचा मोठा भाग आगीत भस्मसात.
  • १५४० : दरबारी राजकारणात इंग्लंडचा राजा हेन्री आठव्याने थॉमस क्रॉमवेलला मृत्युदंड दिला.
  • १७९४ : फ्रेंच क्रांती - मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरेला गिलोटिनवर मृत्युदंड.
  • १८२१ : पेरूने स्वतःला स्पेनपासून स्वतंत्र जाहीर केले.
  • १९१४ : पहिले महायुद्ध - ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९३० : रिचर्ड बेडफोर्ड बेनेट कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
  • १९४२ : दुसरे महायुद्ध - सोवियेत संघाच्या अध्यक्ष जोसेफ स्टालिनने हुकुम काढला ज्यानुसार कोणत्याही परिस्थितीत लढाईतून माघार घेणार्‍या सोवियेत सैनिकांना तत्काळ मृत्यूची शिक्षा लागू झाली.
  • १९४३ : दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सच्या जर्मनीतील हांबुर्ग शहरावरील बॉम्बफेकीत ४२,००० नागरिक ठार.
  • १९४५ : होजे बुस्टामांटे इ रिव्हेरो पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९४५ : अमेरिकेचे बी.२५ प्रकारचे विमान न्यू यॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डींगच्या ७९व्या मजल्यावर आदळले. १४ ठार.
  • १९५० : मनुएल ओड्रिया पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९५६ : मनुएल प्राडो उगार्तेशे पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९६३ : फर्नान्डो बेलॉँडे टेरी पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९७६ : चीनच्या तांग्शान प्रांतात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ ते ८.२च्या दरम्यान तीव्रता असलेला भूकंप. २,४२,७६९ ठार, १,६४,८५१ जखमी.
  • १९८० : फर्नान्डो बेलॉँडे टेरी परत पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९८५ : ऍलन गार्शिया पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९९० : आल्बेर्तो फुजिमोरी पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९९५ : आल्बेर्तो फुजिमोरी दुसर्‍यांदा पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • २००० : आल्बेर्तो फुजिमोरी तिसर्‍यांदा पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • २००१ : अलेहांद्रो टोलेडो पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.

जन्म, वाढदिवस

  • १८९१ : रॉन ऑक्सनहॅम, ओस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९०७ : अर्ल टपर, टपरवेरचा इंग्लिश शोधक.
  • १९२९ जॅकलीन केनेडी-ओनासिस, जॉन एफ. केनेडीची पत्नी.
  • १९३१ : जॉनी मार्टिन, ओस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९३६ : सर गारफील्ड सोबर्स, वेस्ट इंडियन क्रिकेट खेळाडू.
  • १९३८ : आल्बेर्तो फुजिमोरी, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४५ : जिम डेव्हिस, अमेरिकन व्यंगचित्रकार.
  • १९५४ : ह्युगो चावेझ, व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९७० : पॉल स्ट्रँग, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • ४५० : थियोडॉसियस, पवित्र रोमन सम्राट.
  • १०५७ : पोप व्हिक्टर दुसरा.
  • १७९४ : मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे, फ्रेंच क्रांतीकारी.
  • १८४९ : चार्ल्स आल्बर्ट, सार्डिनियाचा राजा.
  • १९३४ : लुइस टँक्रेड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६८ : ऑट्टो हान, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.

No comments:

Post a Comment