Friday 31 July 2015

31st JULY 


३१ जुलै दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | ३१ जुलै २०१३
३१ जुलै दिनविशेष(July 31 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
- -

जागतिक दिवस

  • हरी पहलावान : मलेशिया.
  • का हेइ हवाई : हवाई.

ठळक घटना, घडामोडी

  • ७८१ : जपानच्या फुजियामा ज्वालामुखीच्या उद्रेकाची प्रथम नोंद.
  • १००९ : सर्जियस चौथा पोपपदी.
  • १४९८ : क्रिस्टोफर कोलंबस त्रिनिदादला पोचला.
  • १७०३ : डॅनियेल डॅफोला सरकारविरुद्ध वात्रटिका लिहिल्याबद्दल राजद्रोहाच्या आरोपाखाली चौकात बांधून ठेवून दगडांनी मारण्याची शिक्षा. या वात्रटिका जनतेला इतक्या आवडल्या की त्यांनी डॅफोला दगडांऐवजी फुले मारली.
  • १८५६ : न्यू झीलँडची राजधानी क्राइस्टचर्चची स्थापना.
  • १९१७ : पहिले महायुद्ध - य्प्रेसची तिसरी लढाई.
  • १९३२ : जर्मनीतील निवडणुकांत नाझी पार्टीला ३८% मते मिळाली.
  • १९४० : अमेरिकेत कुयाहोगा फॉल्स, ओहायो येथे रेल्वे अपघात. ४३ ठार.
  • १९४५ : दुसरे महायुद्ध - विची फ्रांसच्या पंतप्रधान पिएर लव्हालने दोस्त राष्ट्रांसमोर आत्मसमर्पण केले.
  • १९४८ : न्यू यॉर्कचा आंतरराष्ट्रीय विमानतळ खुला.
  • १९५१ : जपान एरलाइन्सची स्थापना.
  • १९५४ : इटलीच्या अर्दितो देसियोच्या नेतृत्त्वाखाली गिर्‍यारोहक पथकाचे के-२ शिखरावर पहिले यशस्वी आरोहण.
  • १९५६ : ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर जिम लेकरने एकाच कसोटी सामन्यात १९ बळी मिळवून विश्वविक्रम स्थापला.
  • १९७१ : अपोलो १५च्या अंतराळवीरांनी चंद्रावर पहिल्यांदा मानवनिर्मित बग्गी चालवली.
  • १९७३ : डेल्टा एरलाइन्सचे विमान बॉस्टनच्या लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना कोसळले. ८९ ठार.
  • १९७५ : अमेरिकेतील टीम्स्टर युनियन चा नेता जिमी हॉफा गायब.
  • १९८१ : पनामाचा हुकुमशहा ओमर तोरिहोसचा विमान अपघातात मृत्यू.
  • १९८७ : कॅनडातील एडमंटन शहरात एफ.४ टोर्नेडो. २७ ठार, ३३ कोटी डॉलरपेक्षा जास्त मिळकतीचे नुकसान.
  • १९८८ : मलेशियाच्या बटरवर्थ शहरात फेरीवर जाण्यासाठीचा पूल कोसळला. ३२ ठार, १,६७४ जखमी.
  • १९९२ : थाई एरवेझचे एरबस ए.३०० प्रकारचे विमान नेपाळची राजधानी काठमांडूजवळ कोसळले. ११३ ठार.

जन्म, वाढदिवस

  • ११४३ : निजो, जपानी सम्राट.
  • १५२७ : मॅक्सिमिलियन दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
  • १९०२ : सर ऑस्वाल्ड ब्राउनिंग ऍलन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९१२ : मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ.
  • १९१९ : लेफ्टनंट कर्नल हेमु अधिकारी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९५३ : जिमी कूक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४१ : अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री.
  • १९७५ : अँड्रु हॉल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९८२ : ब्लेसिंग माहविरे, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • ११०८ : फिलिप पहिला, फ्रांसचा राजा.
  • १५०८ : नाओद, इथियोपियाचा सम्राट.
  • १५४७ : फ्रांसिस पहिला, फ्रांसचा राजा.
  • १७५० : होआव पाचवा, पोर्तुगालचा राजा.
  • १८७५ : अँड्रु जॉन्सन, अमेरिकेचा १७वा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४३ : हेडली व्हेरिटी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू (युद्धबंदी असताना).
  • १९७२ : पॉल-हेन्री स्पाक, बेल्जियमचा पंतप्रधान.
  • १९८० : मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक.
  • १९९३ : बॉद्वां पहिला, बेल्जियमचा राजा.