Thursday 16 July 2015

15th JULY 

१५ जुलै दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | १५ जुलै २०१३
१५ जुलै दिनविशेष(July 15 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व : नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, (जन्म : २६ जून, इ.स. १८८८ ; नागठाणे, सांगली, महाराष्ट्र - मृत्यू १५ जुलै, इ.स. १९६७) या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली.

जागतिक दिवस

  • सुलतानाचा वाढदिवस : ब्रुनेई.

ठळक घटना, घडामोडी

  • १९२७ : ‘कुटुंबनियोजन’ या विषयावर लेख लिहून त्याचा जोरदार प्रसार करणारे रघुनाथ धोंडो कर्वे यांचा ‘समाजस्वास्थ’चा पहिला अंक प्रकाशित झाला.

जन्म, वाढदिवस

  • १५७३ : इनिगो जोन्स, लंडनचा वास्तुशास्त्रज्ञ ज्याने सेंट पॉलचे चर्च पुनर्स्थापित केले.
  • १६०६ : रेम्ब्रॅन्ड व्हॅन रिन, नेदरलँडसचा चित्रकार.
  • १७०१ : पेरी ज्युबर्ट, कॅनडातील सर्वात दीर्घायु व्यक्ती, वय वर्षे ११३, दिवस १२४ पर्यंतचे आयुर्मान लाभले.
  • १७०४ : ऑगस्ट गॉटलिब स्पॅन्गेन्बर्ग, दक्षिण अमेरिकेतील मोराव्हियन चर्चचा संस्थापक.
  • १७७९ : क्लेमेंट क्लार्क मूर, अमेरिकन लेखक.
  • १७९६ : थॉमस बुलफिंच
  • १८५० : सेंट फ्रांसिस झेविअर कॅब्रिनी, अमेरिकेतील प्रथम संत.
  • १८७२ : जॉस एन्रिक रोड मॉन्टव्हिडिओ, तत्त्वज्ञ, निबंधकार व शिक्षणतज्ञ.
  • १८८९ : मार्जोरी राम्बाऊ, अभिनेत्री.
  • १९०२ : बेल्जियमचे जिन रे, युरोपियन कमिशनचे १९६७-१९७० दरम्यान अध्यक्षपद भुषविले.
  • १९०४ : मोगूबाई कुर्डीकर, जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका.
  • १९१३ : मर्विन व्हे, अभिनेता.
  • १९१९ : आयरिस मर्डोक, आयर्लंडचा कादंबरीकार.
  • १९२५ : फिल कॅरे, अभिनेता.
  • १९२७ : शिवाजीराव भोसले, ख्यातनाम वक्ते व शिक्षणत‌ज्ञ.
  • १९२७ : कार्मेन झपाटा, अभिनेत्री.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • १२९१ : रुडॉल्फ पहिला, पवित्र रोमन सम्राट.
  • १५२१ : हुआन पॉन्से दे लेऑन, स्पेनचा शोधक.
  • १६५५ : गिरोलामो रैनाल्डी, इटलीचा स्थपती.
  • १९१९ : हेर्मान एमिल फिशर, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
  • १९४६ : रेझर स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९४६ : वन यिदुओ, चिनी भाषेमधील कवी, लेखक.
  • १९४८ : जॉन पर्शिंग, अमेरिकन सेनापती.
  • १९६७ : नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व, संगीत - रंगभूमीवर ‘गंधर्वयुग’ निर्माण करणारे थोर कलावंत.
  • १९७९ : गुस्तावो दियाझ ओर्दाझ, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९९२ : हॅमर डिरॉबुर्ट, नौरूचा राष्ट्राध्यक्षखेळाडू.
  • १९९७ : ज्यानी व्हर्साची, इटलीचा फॅशन डिझायनर.
arrow
close

No comments:

Post a Comment