Thursday 23 July 2015

20th JULY

२० जुलै दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | २० जुलै २०१३
२० जुलै दिनविशेष(July 20 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
नसीरुद्दीन शाह : (२० जुलै १९५०) नसिरुद्दीन शाह हे एक बॉलिवुडमधील अभिनेते व दिग्दर्शक आहेत.

जागतिक दिवस

  • आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन.
  • स्वातंत्र्य दिन : कोलंबिया.
  • शांती व स्वतंत्रता दिन : उत्तर सायप्रस.
  • मैत्री दिन : आर्जेन्टिना, ब्राझिल.

ठळक घटना, घडामोडी

  • ५१४ : हॉर्मिस्दस पोपपदी.
  • १४०२ : तैमुर लंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.
  • १७३८ : पिएर गॉतिये दि व्हारेने एत दि ला व्हेरेन्द्रे हा फ्रेंच शोधक मिशिगन सरोवराच्या पश्चिम किनाऱ्यावर पोचला.
  • १८६४ : अमेरिकन यादवी युद्ध - पीचट्री क्रीकची लढाई.
  • १८७१ : ब्रिटीश कोलंबिया कॅनडात सामील झाले.
  • १८८१ : अमेरिकेच्या मूळ रहिवाश्यांपैकी सू जमातीच्या शेवटच्या टोळीने आपल्या नेता सिटींग बुलसह अमेरिकन सरकारसमोर आत्मसमर्पण केले.
  • १९०३ : फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली कार विकायला पाठवली.
  • १९०७ : अमेरिकेत सेलम, मिशिगन येथे रेल्वे अपघात. ३० ठार, ७० जखमी.
  • १९१५ : वेल्समध्ये कोळसा खाण कामगारांचा संप मिटला.
  • १९२१ : टॅम्पिको, मेक्सिको येथील खनिज तेलाच्या विहीरींना आग. कोट्यावधी डॉलरचे नुकसान.
  • १९२१ : न्यू यॉर्क व सान फ्रांसिस्को दरम्यान हवाई टपालसेवा सुरू.
  • १९२२ : लीग ऑफ नेशन्सने आफ्रिकेतील टोगोलँड फ्रांसला तर टांगानिका युनायटेड किंग्डमला दिले.
  • १९२४ : ईराणची राजधानी तेहरानमध्ये अमेरिकन राजदूत रॉबर्ट इम्ब्रीची हत्या, लश्करी कायदा लागू.
  • १९२६ : मेथोडिस्ट चर्चने स्त्रीयांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.
  • १९२७ : मायकेल पहिला रोमेनियाच्या राजेपदी.
  • १९२९ : सोवियेत संघाच्या सैन्याने आमूर नदी ओलांडुन मांचुरियात घुसण्याचा प्रयत्न केला.
  • १९३२ : जर्मनीने प्रशियात लश्करी अंमल लागू केला.
  • १९३३ : लंडनमध्ये ज्यू व्यक्तींना सहानुभूती दाखवण्यास ५,००,००० लोकांची रॅली.
  • १९३३ ; जर्मनीच्या न्युरेम्बर्ग शहरात २०० ज्यू व्यापार्‍यांना अटक करून धिंड काढली गेली.
  • १९३५ : रॉयल डच एरलाइन्सचे विमान स्वित्झर्लंडमध्ये कोसळले. १३ ठार.
  • १९३५ : लाहोरमध्ये मुस्लिम व शिख धर्मियांमध्ये मारामारी. ११ ठार.
  • १९३७ : फ्लोरिडातील टॅलाहासीशहराच्या तुरुंगात असलेल्या दोन श्यामवर्णीय कैद्यांना श्वेतवर्णीय जमावाने पळवून नेले व जाहीर फाशी दिली.
  • १९४० : डेन्मार्क लीग ऑफ नेशन्समधून बाहेर.
  • १९४४ : दुसरे महायुद्ध - ऍडोल्फ हिटलरवर असफल खूनी हल्ला.
  • १९४४ : मुंबई शहरात कॉलेराच्या साथीनेच ३४,०० लोक मृत्युमुखी पडल्याचे सरकारी अधिकार्‍यांनी मान्य केले.
  • १९४७ : म्यानमारमध्ये ऑँग सानच्या खूना बद्दल भूतपूर्व पंतप्रधान उ सॉ व १९ इतरांना अटक.
  • १९४७ : भारतीय व्हाइसरॉय लुई माउंटबॅटनने जाहीर वक्तव्य दिले की वायव्य सरहद्दी प्रांतातील निवडणुकीत जनतेने पाकिस्तानात विलीन होण्याचा कौल दिला आहे.
  • १९४८ : सिंगमन र्‍ही दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९४९ : इस्रायेल व सिरीयामध्ये संधी.
  • १९४९ : व्हासिल कोलारोव्ह बल्गेरियाच्या पंतप्रधानपदी.
  • १९५० : बेल्जियमच्या संसदेने राजा लिओपोल्ड तिसर्‍याला अज्ञातवासातून परत बोलावले.
  • १९५० : कोरियन युद्ध - उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाची तात्पुरती राजधानी तैजोन वर हल्ला चढवला.
  • १९५१ : जॉर्डनचा राजा अब्दुल्ला पहिल्याची हत्या.
  • १९५२ : फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे पंधरावे ऑलिंपिक खेळ सुरू.
  • १९५४ : व्हियेतनाम युद्ध - जिनिव्हा येथे शस्त्रसंधी. देशाचे १७व्या अक्षांशावर विभाजन.
  • १९५५ : चीनने तैवानच्या क्वेमॉय व मात्सु बेटांवर तोफा डागल्या.
  • १९५८ : युगोस्लाव्हियातील कोकिन ब्रेगच्या लश्करी तळावर स्फोट. २६ ठार.
  • १९५९ : इथियोपियाचा सम्राट हेल सिलासी फ्रांसमध्ये.
  • १९६० : सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी. भंडारनायके जगातील प्रथम निर्वाचित स्त्री राष्ट्रप्रमुख.
  • १९६० : साएब सालेम लेबेनॉनच्या पंतप्रधानपदी.
  • १९६१ : कुवैतला अरब संघचे सदस्यत्त्व.
  • १९६२ : कोलंबियात भूकंप. ४० ठार.
  • १९६४ : व्हियेतनाम युद्ध - व्हियेतकॉँगने दक्षिण व्हियेतनामवर हल्ला केला. ११ सैनिक व ४० नागरिक ठार.
  • १९६५ : एलियास त्सिरिमोकोस ग्रीसच्या पंतप्रधानपदी.
  • १९६९ : अपोलो ११ चंद्रावर उतरले.
  • १९६९ : होन्डुरास व एल साल्वाडोरमध्ये शस्त्रसंधी.
  • १९७१ : सिरिया व जॉर्डनच्या सैन्यांमध्ये चकमक.
  • १९७२ : नेदरलँड्सच्या पंतप्रधान बारेंड बियेश्युव्हेलने राजीनामा दिला.
  • १९७३ : केन्याच्या अर्थमंत्री ज्युलियस कियानोने जाहीर केले की देशातील एशियन लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.
  • १९७३ : पेलेस्टाईनच्या दहशतवाद्यांनी जपान एरलाइन्सचे विमान पळवून दुबईला नेले.
  • १९७४ : तुर्कस्तानने सायप्रसमध्ये आपले सैनिक उतरवले.
  • १९७५ : सरकारी सेंसरशिप नाकारल्यामुळे भारताने पाश्चिमात्य पत्रकारांना देशातून हाकलले.
  • १९७६ : व्हायकिंग १ हे अंतराळयान मंगळावर उतरले.
  • १९७६ : व्हियेतनाम युद्ध - अमेरेकेने थायलंडमधून आपले सैनिक काढून घेतले.
  • १९७७ : पेनसिल्व्हेनियातील जॉन्सटाउन शहरात पूर. ८० ठार, कोट्यावधी डॉलरचे नुकसान.
  • १९७९ : डायना न्याड बहामा ते फ्लोरिडा हे ६० मैलांचे अंतर पोहून गेली.
  • १९८२ : आयरिश मुक्ती सेनेने लंडनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. ८ सैनिक ठार, ४७ जखमी.
  • १९८३ : इस्रायेलने बैरुतमधुन आपले सैनिक काढून घेतले.
  • १९८५ : अरूबाने नेदरलँड्स अँटिल्सपासुन विभक्त होण्याचे ठरवले.
  • १९८९ : म्यानमारच्या सरकारने ऑँग सान सू कीला नजरकैदेत टाकले.
  • १९९२ : वाक्लाव हावेलने चेकोस्लोव्हेकियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
  • १९९२ : टी.यु. १५४ प्रकारचे विमान त्ब्लिसीजवळ कोसळले. ४० ठार.
  • १९९६ : स्पेनमध्ये विमानतळावर दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. ३५ ठार.
  • १९९७ : बिल्याना प्लाव्ह्सिकने बॉस्निया व हर्झगोव्हेनाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
  • १९९८ : तालिबानच्या हुकुमावरुन २०० स्वयंसेवी डॉक्टर व इतर संस्थांनी अफगाणिस्तान सोडले.
  • १९९९ : चीनने फालुन गॉँग या संघटनेस दुष्ट संघटना ठरवले व त्यावर बंदी टाकली.
  • २००२ : पेरूची राजधानी लिमा येथे एका डिस्कोला आग. २५ ठार.
  • २००३ : केन्यात प्रवासी विमान कोसळले. १४ ठार.
  • २००५ : चीनच्या शांक्सी प्रांतातील कोळश्याच्या खाणीत स्फोट. २४ ठार.
  • २०१२ : अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील डेन्व्हर शहराच्या अरोरा उपनगरात बॅटमॅन:द डार्क नाइट राइझेस या चित्रपटाचा पहिल्या खेळ चालू असताना जेम्स होम्स नावाच्या व्यक्तीने चित्रपटगृहात अंदाधुंद गोळीबार केला. १२ ठार, ५९ जखमी.

जन्म, वाढदिवस

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • ९८५ : पोप बॉनिफेस सातवा.
  • १०३१ : रॉबर्ट दुसरा, फ्रांसचा राजा.
  • ११५६ : टोबा, जपानी सम्राट.
  • १३२० : ओशिन, आर्मेनियाचा राजा.
  • १४५४ : जॉन दुसरा, कॅस्टिलचा राजा.
  • १९०३ : पोप लिओ तेरावा.
  • १९२२ : आंद्रे मार्कोव्ह, रशियन गणितज्ञ.
  • १९२३ : पांचो व्हिया, मेक्सिकन क्रांतीकारी.
  • १९२७ : फर्डिनांड, रोमेनियाचा राजा.
  • १९३७ : गुग्लियेल्मो मार्कोनी, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९५१ : अब्दुल्ला पहिला, जॉर्डनचा राजा.
  • १९५३ : डुमार्सैड एस्टिमे, हैतीचा राष्ट्राध्यक्ष.

No comments:

Post a Comment