Sunday, 12 July 2015

११ जुलाई दिनविशेष 

११ जुलै दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | ११ जुलै २०१३
११ जुलै दिनविशेष(July 11 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
जागतिक लोकसंख्या दिन : लोकसंख्या म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या. लोकसंख्या मोजायचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक देश आपल्या लोकसंख्येची ठरावीक कालखंडानंतर गणना करतो. सहसा हा कालखंड १० वर्षे असतो व दर वर्षी वाढीव संख्येचा अंदाज प्रकाशित केला जातो.

जागतिक दिवस

  • जागतिक लोकसंख्या दिन : संयुक्त राष्ट्रे.
  • नाडम : मंगोलिया.
  • राष्ट्रीय समुद्री दिन : चीन.

ठळक घटना, घडामोडी

  • १३४६ : लक्झेम्बर्गचा चार्ल्स पाचवा पवित्र रोमन सम्राटपदी.
  • १४०५ : चीनचा झ्हेंग हे जहाजांचा तांडा घेउन जग धुंडाळायला निघाला.
  • १५७६ ; मार्टिन फ्रोबिशरला लांबून ग्रीनलँडचा किनारा दिसला.
  • १७५० : कॅनडातील हॅलिफॅक्स शहर आगीत भस्मसात.
  • १८०४ : अमेरिकेच्या उपराष्ट्रपती एरन बरने अर्थमंत्री अलेक्झांडर हॅमिल्टनला द्वंद्वयुद्धात ठार केले.
  • १८११ : इटलीच्या आमादिओ ऍव्होगाड्रोने आपला वायुच्या अणुरचनेचा सिद्धांत प्रकाशित केला.
  • १८५९ : चार्ल्स डिकन्सची ए टेल ऑफ टू सिटीज ही कादंबरी प्रकाशित.
  • १८८९ : मेक्सिकोतील तिहुआना शहराची स्थापना.
  • १९१९ : नेदरलँड्समध्ये कामगारांकडून एका दिवसात जास्तीत जास्त आठ तासांचे काम घ्यायचा व रविवारी सुट्टी देण्याचा कायदा लागू झाला.
  • १९२१ : मंगोलियाला चीनपासून स्वातंत्र्य.
  • १९४० : हेन्री फिलिप पेटैं विची फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
  • १९५५ : अमेरिकेने आपल्या चलनावर इन गॉड वी ट्रस्ट (देवावर आमचा विश्वास आहे) असे मुद्रित करण्याचे ठरवले.
  • १९५७ : करीम हुसेनी आगाखान इस्माइलीपंथाच्या प्रमुखपदी.
  • १९६० : हार्पर लीची टु किल ए मॉकिंगबर्ड ही कादंबरी प्रकाशित.
  • १९७१ : चिलीने तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण केले.
  • १९७३ : ब्राझिलचे बोईंग ७०७ प्रकारचे विमान पॅरिस ओर्लि विमानतळावर कोसळले. १३४ पैकी १२३ प्रवासी ठार.
  • १९७५ : चीनमध्ये इ.स.पू. तिसर्‍या शतकातील चीनी मातीच्या ६,००० मुर्ती असलेली दफनभूमी सापडली.
  • १९७८ : स्पेनमध्ये प्रवाहीकृत वायू घेउन चाललेल्या ट्रकला अपघात. २१६ ठार.
  • १९७९ : अमेरिकेचे अंतराळस्थानक स्कायलॅब पृथ्वीवर कोसळले.
  • १९८२ : फुटबॉल विश्वकपच्या अंतिम सामन्यात इटलीने पश्चिम जर्मनीला ३-१ असे पराभूत केले.
  • १९८३ : इक्वेडोरमध्ये बोईंग ७२७ प्रकारचे विमान कोसळले. ११९ प्रवासी ठार.
  • १९९१ : नायजेरिन एरवेझने भाड्याने घेतलेले नेशनएरचे डी.सी.८ प्रकारचे विमान जेद्दा येथे कोसळले. २६१ प्रवासी ठार.
  • १९९५ : अमेरिका व व्हियेतनाममध्ये राजनैतिक संबंध पुनःप्रस्थापित.
  • १९९५ : स्रेब्रेनिकाची कत्तल - युगोस्लाव्हिया व बॉस्नियाच्या सैन्याने स्रेब्रेनिका शहर काबीज केले व ८,००० व्यक्तींना ठार मारले.
  • १९९५ : क्युबाना दि एव्हिएशनचे ए.एन.२४ प्रकारचे विमान कॅरिबियन समुद्रात कोसळले. ४४ ठार.
  • २००३ : १८ महिने बंद असलेली लाहोर-दिल्ली बस पुनः सुरू.
  • २००४ : सी.आय.ए.च्या निदेशक जॉर्ज टेनेटने राजीनामा दिला.
  • २००६ : मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट. १००हून अधिक ठार.

जन्म, वाढदिवस

  • १२७४ : रॉबर्ट द ब्रुस, स्कॉटलंडचा राजा.
  • १६५७ : फ्रेडरिक पहिला, प्रशियाचा राजा.
  • १७६७ : जॉन क्विन्सी ऍडम्स, अमेरिकेचा ६वा राष्ट्राध्यक्ष.
  • १९१६ : गॉफ व्हिटलॅम, ऑस्ट्रेलियाचा २१वा पंतप्रधान.
  • १९३० : जॅक अलाबास्टर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९५० : जिम हिग्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • ४७२ : अँथेमियस, पश्चिम रोमन सम्राट.
  • ९३७ : रुडॉल्फ दुसरा, बरगंडीचा राजा.
  • ११७४ : अमाल्रिक, जेरुसलेमचा राजा.
  • १६८८ : नराई, सयामचा राजा.
  • १८०४ : अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा अर्थमंत्री.
  • १९५९ : चार्ली पार्कर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९८९ : सर लॉरेंस ऑलिव्हिये, ब्रिटीश अभिनेता.

No comments:

Post a Comment