Wednesday, 29 July 2015

27th JULY

२७ जुलै दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | २७ जुलै २०१३
२७ जुलै दिनविशेष(July 27 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
बग्स बनी - हे एल्‌. एस्‌. निर्मीत एक अ‍ॅनिमेटेड कार्टुन कॅरेक्टर आहे.

जागतिक दिवस

  • होजे सेल्सो बार्बोसा दिन : पोर्तोरिको.

ठळक घटना, घडामोडी

  • १५४९ : जेसुइट धर्मगुरू फ्रांसिस झेवियरचे जपानमध्ये आगमन.
  • १६६३ : ब्रिटीश संसदेने कायदा केला ज्यानुसार अमेरिकेत जाणारा सगळा माल इंग्लंडच्याच जहाजातून इंग्लिश बंदरातूनच पाठवणे बंधनकारक ठरले.
  • १६९४ : बँक ऑफ इंग्लंडची रचना.
  • १७७८ : अमेरिकन क्रांती-उशांतची पहिली लढाई - इंग्लंड व फ्रांसच्या आरमारे तुल्यबळ.
  • १७९४ : फ्रेंच क्रांती - १७,००पेक्षा अधिक क्रांतीशत्रूंच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेत हात असलेल्या मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरेला अटक.
  • १८६६ : आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. यायोगे युरोप व अमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य.
  • १८८० : दुसरे अँग्लो-अफगाण युद्ध-मैवांदची लढाई - अफगाण सैन्याचा विजय. दोन्हीकडे असंख्य सैनिक मृत्युमुखी.
  • १९२१ : फ्रेडरिक बँटिंगने इन्सुलिनचा शोध लावला.
  • १९४० : बग्स बनीचे चित्रपटसृष्टीत पदार्पण.
  • १९४९ : जगातील पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण.
  • १९५३ : कोरियन युद्ध - चीन, उत्तर कोरिया व अमेरिकेची शस्त्रसंधी. दक्षिण कोरियाने संधीवर सही करण्यास नकार दिला परंतु संधी मान्य केली.
  • १९५५ : दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातून आपले सैनिक काढून घेतले.
  • १९७४ : वॉटरगेट कुभांड - अमेरिकन काँग्रेसच्या न्यायिक समितीने राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन वर महाभियोग सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
  • १९७६ : जपानच्या भूतपूर्व पंतप्रधान काकुएइ तनाकाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक.
  • १९९० : बेलारूसने सोवियेत संघापासून स्वातंत्र्य जाहीर केले.
  • १९९० : त्रिनिदाद व टोबॅगोमध्ये जमात-ए-मुसलमीनने उठाव केला आणि संसद व दूरचित्रवाणी कार्यालयात मुक्काम ठोकला.
  • १९९६ : अमेरिकेच्या अटलांटा शहरात १९९६ उन्हाळी ऑलिंपिक सुरू असताना सेंटेनियल ऑलिंपिक पार्क येथे गावठी बॉम्बचा स्फोट. १ ठार, १११ जखमी.
  • १९९७ : अल्जीरियात सि झेरूक येथे दहशतवाद्यांनी ५० व्यक्तींना ठार मारले.
  • २००२ : युक्रेनच्या ल्विव शहरात सुरू असलेल्या विमानांच्या प्रात्यक्षिकांदरम्यान सुखॉई एस.यु.२७ प्रकारचे विमान प्रेक्षकांवर कोसळले. ८५ ठार, १०० जखमी.

जन्म, वाढदिवस

  • १६६७ : योहान बर्नोली, स्विस गणितज्ञ.
  • १८५७ : होजे सेल्सो बार्बोसा, पोर्तोरिकन नेता.
  • १८८२ : जॉफ्रे डी हॅविललँड, ब्रिटीश विमान अभियंता.
  • १८९९ : पर्सी हॉर्नीब्रूक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९१५ : जॅक आयव्हरसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९५५ : ऍलन बॉर्डर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९६३ : नवेद अंजुम, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • ११०१ : कॉन्राड, जर्मनीचा राजा.
  • १२७६ : जेम्स पहिला, अरागॉनचा राजा.
  • १५६४ : फर्डिनांड पहिला, पवित्र रोमन सम्राट.
  • १९८० : मोहम्मद रझा पहलवी, ईराणचा शहा.
  • २००२ : कृष्णकांत, भारताचे उपराष्ट्रपती.
  • २००३ : बॉब होप, इंग्लिश अभिनेता.

No comments:

Post a Comment