Saturday 4 July 2015

3rd JULY

३ जुलै दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | ३ जुलै २०१३
३ जुलै दिनविशेष(July 3 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
नामदेव - (१२७० - ३ जुलै १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. ते मराठी भाषेमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व हिंदुस्तानी भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत.नामदेव हे ‘मराठी’ तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’ च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.

जागतिक दिवस

  • -

ठळक घटना, घडामोडी

  • ३२४ : एड्रियानोपलची लढाई.
  • ५३३ : ऍड डेसिममची लढाई.
  • ९८७ : ह्यु कापे फ्रांसच्या राजेपदी.
  • १२५० : सातवी क्रुसेड - मामलुकसैन्याने फ्रांसचा राजा लुई नवव्याला पकडले.
  • १६०८ : कॅनडात क्वेबेक सिटी शहराची स्थापना.
  • १७५४ : जॉर्ज वॉशिंग्टनने फोर्ट नेसेसिटी हा किल्ला फ्रेंच सैन्याला दिला.
  • १७६७ : रॉबर्ट पिटकैर्नने पिटकैर्न द्वीपसमूह शोधला.
  • १७७८ : अमेरिकन क्रांती - ब्रिटीश सैन्याने वायोमिंग मध्ये ३६० स्त्री, पुरूष व बालकांची कत्तल केली.
  • १७७८ : प्रशियाने ऑस्ट्रिया विरुद्ध युद्ध पुकारले.
  • १८४८ : यु.एस. व्हर्जिन आयलँड्समध्ये गुलामांना मुक्ती देण्यात आली.
  • १८५२ : महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
  • १८८४ : न्यू यॉर्क शेरबाजारातील शेर्सचा निर्देशांक डौ जोन्स इंडस्ट्रीयल ऍव्हरेज प्रथम प्रकाशित.
  • १८९० : आयडाहो अमेरिकेचे ४३वे राज्य झाले.
  • १८९८ : स्पॅनिश अमेरिकन युद्ध - अमेरिकेच्या आरमाराने सान्टियागो, क्युबा येथे स्पॅनिश युद्धनौका बुडवल्या.
  • १८९८ : जोशुआ स्लोक्रम या खलाशाने एकट्याने जहाजातून ११६६ दिवसांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
  • १९२८ : लंडनमध्ये प्रथमतः रंगीत दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रक्षेपण करण्यात आले.
  • १९३८ : इंग्लंडमध्ये मलार्ड या वाफेवर चालणाऱ्या रेल्वे ईंजिनाने ताशी २०३ कि.मी. वेगाने धावून सर्वाधिक गतीचा विश्वविक्रम केला.
  • १९५२ : अमेरिकेने पोर्तोरिकोचे संविधान मान्य केले.
  • १९६४ : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनने १९६४चा नागरी हक्क कायद्यावर सही केली.
  • १९७० : इंग्लंडचे डी हॅविललँड कॉमेट प्रकारचे विमान स्पेनमध्ये बार्सेलोना शहराजवळ कोसळले. ११२ ठार.
  • १९७६ : इस्रायेलच्या कमांडो सैनिकांनी युगांडात ओलिस असलेल्या १०५ विमानप्रवाश्यांना सोडवले.
  • १९८८ : अमेरिकेच्या यु.एस.एस. व्हिन्सेनेस या युद्धनौकेने इराण एर फ्लाइट ६५५ हे एरबस ए-३०० प्रकारचे विमान पाडले. २९० ठार.
  • २००१ : व्लादिवोस्तोकिया एरलाइन्सचे टी.यु.१५४ प्रकारचे विमान इर्कुट्स्क येथे कोसळले. १४५ ठार.
  • २००४ : थायलंडची राजधानी बँगकॉकची भुयारी रेल्वे सुरू.
  • २००६ : २००४ एक्स.पी.१४ हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून (साधारण चंद्राइतक्या अंतरावरून) गेला.

जन्म, वाढदिवस

  • १४२३ : लुई अकरावा, फ्रांसचा राजा.
  • १४४२ : गो-त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट.
  • १६८३ : एडवर्ड यंग, इंग्लिश कवी.
  • १७१७ : जोसेफ लॅसोन, फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ.
  • १८७० : रिचर्ड बेडफोर्ड बेनेट, कॅनडाचा पंतप्रधान.
  • १८८६ : गुरुदेव रामचंद्र रानडे यांचा जन्म.
  • १९०२ : जॅक न्यूमन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९०९ : भाऊसाहेब तारकुडे, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, कायदेतज्ज्ञ.
  • १९२४ : सेल्लप्पन रामनाथन, तमिळवंशीय सिंगापुरी राजकारणी, सिंगापुराच्या प्रजासत्ताकाचा ६वा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४६ : लेसेक मिलर, पोलंडचा पंतप्रधान.
  • १९५० : इवन चॅटफील्ड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९५१ : सर रिचर्ड हॅडली, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९५२ : वासिम राजा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९७६ : हेन्री ओलोंगा, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९८० : हरभजनसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • ६८३ : संत लिओ दुसरा.
  • १३५० : संत नामदेव यांनी पंढरपूर येथे समाधी घेतली.
  • १३५० : संत जनाबाई यांनी समाधी घेतली.
  • १९१८ : महमद पाचवा, ओट्टोमन सम्राट.
  • १९३३ : हिपोलितो य्रिगोयेन, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९३५ : आंद्रे सिट्रोएन, फ्रेंच अभियंता.
  • १९९६ : राजकुमार, हिंदी अभिनेता.

No comments:

Post a Comment