Friday 10 July 2015

१० जुलै दिनविशेष



१० जुलै दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | १० जुलै २०१३
१० जुलै दिनविशेष(July 10 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
सुनील मनोहर गावसकर : सुनील मनोहर गावसकर यांचा जन्म (जुलै १०, १९४९ - हयात) हे भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले फलंदाज आहेत. कसोटी सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वोत्तम आघाडीचा फलंदाज म्हणून त्यांना गणले जाते. भारतीय संघातर्फे त्यांनी १२५ कसोटी सामने खेळून ५१.१२ धावांच्या सरासरीने एकूण १०,१२२ धावा काढल्या.

जागतिक दिवस

  • स्वातंत्र्य दिन : बहामा.
  • सैन्य दिन : मॉरिटानिया.

ठळक घटना, घडामोडी

  • १२१२ : लंडन शहराचा मोठा भाग प्रचंड आगीच्या भक्ष्यस्थानी.
  • १५८४ : ऑरेंजच्या विल्यम पहिल्याची राहत्या महालात हत्या.
  • १६८५ : इंग्लिश गृहयुद्ध - लँगपोर्टची लढाई.
  • १७७८ : अमेरिकन क्रांती - फ्रांसने युनायटेड किंग्डम विरुद्ध युद्ध पुकारले.
  • १७८९ : अलेक्झांडर मॅकेन्झी मॅकेन्झी नदीच्या मुखाशी पोचला.
  • १७९६ : कार्ल फ्रीडरिक गॉसच्या सर्वप्रथम लक्षात आले की कोणताही आकडा जास्तीत जास्त तीन त्रिकोणी आकड्यांची बेरीज असतो.
  • १८०० : कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना.
  • १८५० : मिलार्ड फिलमोर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १८९० : वायोमिंग अमेरिकेचे ४४वे राज्य झाले.
  • १९२५ : तास या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना.
  • १९२५ : उत्क्रांतीवाद शिकवल्या बद्दल अमेरिकेच्या डेटन, टेनेसी शहरात जॉन टी. स्कोप्स या शिक्षकावर खटला भरण्यात आला.
  • १९४० : दुसरे महायुद्ध - विची फ्रांसच्या सरकारची रचना.
  • १९४७ : मुहम्मद अली जिना पाकिस्तानच्या गव्हर्नर-जनरलपदी.
  • १९६२ : टेलस्टार या जगातील पहिल्या संदेशवाहक उपग्रहाचे प्रक्षेपण.
  • १९६७ : न्यु झीलँडने आपले चलन दशमान पद्धतीत आणले.
  • १९६८ : मॉरिस कुव्ह दि मुरव्हिल फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
  • १९७३ : बहामाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९७३ : पाकिस्तानने बांगलादेशचे स्वातंत्र्य मान्य केले.
  • १९७६ : इटलीत सेव्हेसो येथे विषारी वायुगळती. ३,००० प्राणी मृत्युमुखी. ७०,००० अजून प्राण्यांची कत्तल.
  • १९७८ : मॉरिटानियात लश्करी उठाव.
  • १९९१ : बोरिस येल्त्सिन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९९२ : मादक द्रव्यांच्या तस्करी बद्दल पनामाच्या भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष मनुएल नोरिगाला फ्लोरिडात ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.
  • २००० : नायजेरियात फुटलेल्या तेलवाहिकेत स्फोट. त्यातून गळणारे पेट्रोल भरण्यासाठी जमलेल्यांपैकी २५० व्यक्ती ठार.
  • २००३ : हाँग काँगमध्ये बस अपघातात २१ ठार.

जन्म, वाढदिवस

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • १३८ : हेड्रियान.
  • ११०३ : एरिक पहिला, डेन्मार्कचा राजा.
  • १२९८ : लाडिस्लॉस चौथा, हंगेरीचा राजा.
  • १४८० : रेने पहिला, नेपल्सचा राजा.
  • १५५९ : दुसरा हेन्री, फ्रान्सचा राजा.
  • १५८४ : विल्यम पहिला, ऑरेंजचा राजा.
  • १९६९ : डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर, गोव्याचे इतिहास संशोधक.
  • १९७० : ब्यार्नी बेनेडिक्ट्सन, आइसलँडचा पंतप्रधान.
  • १९७८ : जॉन डी. रॉकफेलर तिसरा, अमेरिकन उद्योगपती.
  • २००५ : जयवंत कुलकर्णी, मराठी गायक.
  • २०१४ : जोहरा सहगल, ज्येष्ठ अभिनेत्री.


arrow
close




No comments:

Post a Comment