Sunday, 19 July 2015

19th JULY 

१९ जुलै दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | १९ जुलै २०१३
१९ जुलै दिनविशेष(July 19 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
जयंत विष्णू नारळीकर : (जुलै १९, १९३८ - हयात) हे मराठी खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत. चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

जागतिक दिवस

  • शहीद दिन : म्यानमार.
  • राष्ट्रीय मुक्ती दिन : निकाराग्वा.
  • राष्ट्राध्यक्ष दिन : बॉत्स्वाना.

ठळक घटना, घडामोडी

  • १५५३ : मेरी पहिली इंग्लंडच्या राणीपदी.
  • १६९२ : अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली ५ स्त्रीयांना फाशी देण्यात आली.
  • १८७० : फ्रांसने प्रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९१२ : अमेरिकेतील हॉलब्रुक शहरावर उल्कापात. सुमारे १६,००० उल्का जमिनीपर्यंत पोचल्या.
  • १९४० : दुसरे महायुद्ध - केप स्पादाची लढाई.
  • १९४७ : म्यानमारच्या सरकारचा योजित पंतप्रधान ऑँग सान व ६ मंत्र्यांची हत्या.
  • १९६३ : ज्यो वॉकरने त्याचे एक्स १५ प्रकारचे प्रायोगिक विमान १,०६,०१० मीटर (३,४७,८०० फूट) उंचीवर नेले.
  • १९६७ : पीडमॉँट एरलाइन्सचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान सेसना ३१०शी अमेरिकेतील हेंडर्सनव्हिल शहराजवळ धडकले. ८२ ठार.
  • १९७६ : नेपाळमध्ये सगरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना.
  • १९७९ : निकाराग्वात उठाव.
  • १९८५ : ईटलीतील व्हाल दि स्लाव्हा धरण फुटले. पुरात २६८ ठार.
  • १९८९ : युनायटेड एरलाइन्स फ्लाइट २३२ हे डी.सी. १० प्रकारचे विमान अमेरिकेतील सू सिटी शहराजवळ कोसळले. वैमानिकांच्या कौशल्यामुळे १८४ प्रवासी वाचले परंतु ११२ अन्य प्रवासी मृत्युमुखी.

जन्म, वाढदिवस

  • १८१४ : सॅम्युअल कॉल्ट, अमेरिकन संशोधक.
  • १८३४ : एदगा दगा, फ्रेंच चित्रकार.
  • १८७६ : जॉन गन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८७७ : आर्थर फील्डर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८९४ : ख्वाजा नझिमुद्दीन, पाकिस्तानचा दुसरा पंतप्रधान.
  • १८९६ : ए.जे. क्रोनिन, स्कॉटिश लेखक.
  • १९३४ : फ्रांसिस्को से कमेरो, पोर्तुगालचा पंतप्रधान.
  • १९३८ : डॉ. जयंत विष्णू नारळीकर, भारतीय अंतराळ-भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९४६ : इली नास्तासे, रोमेनियन टेनिस खेळाडू.
  • १९५५ : रॉजर बिन्नी, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • ५१४ : पोप सिमाकस.
  • ९३१ : उडा, जपानी सम्राट.
  • १७४५ : राणोजी शिंदे, पेशवाईतील घोडदळाचे प्रमुख सेनापती व जहागिरदार.
  • १९४७ : ऑँग सान, म्यानमारचा स्वातंत्र्यसैनिक.
  • १९६५ : सिंगमन र्‍ही, दक्षिण कोरियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
  • १९८० : निहात एरिम, तुर्कस्तानचा पंतप्रधान.
  • २००४ : झेन्को सुझुकी, जपानचा पंतप्रधान.

No comments:

Post a Comment