14 th JULY
१४ जुलै दिनविशेष
द्वारे स्वाती खंदारे | प्रकाशक संपादक मंडळ | १४ जुलै २०१३
१४ जुलै दिनविशेष(July 14 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
गोपाळ गणेश आगरकर - गोपाळ गणेश आगरकर (जुलै १७, १८५६ - १८९५) हे मराठी पत्रकार, समाजसुधारक होते. आगरकर हे, बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले.
जागतिक दिवस
- बॅस्टिल दिन : फ्रांस.
ठळक घटना, घडामोडी
- १२२३ : लुई आठवा फ्रांसच्या राजेपदी.
- १७८९ : पॅरिसमध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे व दडपशाहीचे चिह्न असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला व आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची मुहुर्तमेढ होती.
- १७९१ : फ्रेंच क्रांतीपासून पळून इंग्लंडमध्ये आश्रय घेतलेल्या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ जोसेफ प्रिस्टलीची बर्मिंगहॅम शहरातून हकालपट्टी.
- १९२५ : जर्मनीत नाझी पक्षाव्यतिरिक्त सगळ्या राजकीय पक्षांवर बंदी.
- १९४३ : अमरिकेतील सेंट लुई शहरात जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरचे स्मारक खुले.
- १९५८ : इराकमध्ये राजेशाहीविरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.
- १९६६ : अमेरिकेतील शिकागो शहरात रिचर्ड स्पेकने आठ परिचारिका-विद्यार्थिनींची हत्या केली.
- १९६६ : ग्वाटेमाला सिटीतील मनोरुग्णालयात आग. २२५ ठार.
- १९८४ : डेव्हिड लँग न्यू झीलँडच्या पंतप्रधानपदी.
- २००० : फिजीतील उठावाचा सूत्रधार जॉर्ज स्पेटला अटक व देशद्रोहाचा आरोप.
जन्म, वाढदिवस
- १८५६ : गोपाळ गणेश आगरकर, समाजसुधारक.
- १८६२ : गुस्टाफ क्लिम्ट, ऑस्ट्रियन चित्रकार.
- १८७४ : अब्बास दुसरा, इजिप्तचा राजा.
- १८८५ : सिसावांग वॉँग, लाओसचा राजा.
- १९१० : विल्यम हॅना, अमेरिकन चित्रकार, टॉम अँड जेरी चित्रकथेसाठी चित्रे काढली.
- १९१३ : जेरी फोर्ड, अमेरिकेचा ३८वा राष्ट्राध्यक्ष.
- १९२० : शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीयमंत्री.
- १९६७ : हशन तिलकरत्ने, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७६ : जरैंट जोन्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- १२२३ : फिलिप दुसरा, फ्रांसचा राजा.
- १२७४ : संत बोनाव्हेंचर.
- १८८१ : बिली द किड, अमेरिकन दरोडेखोर.
- १८८७ : आल्फ्रेड क्रुप, जर्मन उद्योगपती.
- १९०४ : पॉल क्रुगर, दक्षिण आफ्रिकेचा क्रांतीकारी.
- २००२ : होआकिन बॅलाग्वेर, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
- २००८ : यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश.
YOU MAY LIKE
चकवा
माणसाला नेहेमी पुर्वसुचना मिळत असतात. कधी आपल्या मनाकडुन तर कधी निसर्गाकडुन, पण बहुतांश लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि गोत्यात येतात.
- नवीन लेखन
- लोकप्रिय लेखन
- वाचकांचे अभिप्राय
पाऊस
विभाग मराठी कविता
स्त्रीशक्ती
विभाग मराठी कविता
पावसाळा नव्याने
विभाग मराठी कविता
आम्ही नोकरीवाल्या
विभाग मराठी लेख
FROM THE WEB
उत्कृष्ट दहा
Legal - No Part of this Website, Including photocopy is permitted to copy or translate in any language, without prior permission in writing.
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
No comments:
Post a Comment