Saturday 25 July 2015

25th JULY

२५ जुलै दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | २५ जुलै २०१३
२५ जुलै दिनविशेष(July 25 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
लुईस ब्राऊन - (जन्म २५ जुलै १९७८) हि "आयव्हीएफ' (IVF) तंत्राचा उपयोग करून जन्माला आलेली पहिली मानव टेस्टट्यूब बेबी आहे.

जागतिक दिवस

  • गॅलिशिया दिन : गॅलिशिया(स्पेन).
  • संविधान दिन : पोर्तोरिको.
  • प्रजासत्ताक दिन : ट्युनिसीया.

ठळक घटना, घडामोडी

  • ३०६ : कॉन्स्टॅटाईन पहिला रोमन सम्राटपदी.
  • ८६४ : इंग्लंडचा राजा टकल्या चार्ल्सने व्हाईकिंग लुटारूंपासुन संरक्षणासाठी तटबंदी उभारण्यास सुरूवात केली.
  • १५४७ : हेन्री दुसरा फ्रांसच्या राजेपदी.
  • १५९३ : फ्रांसचा राजा हेन्री चौथ्याने जाहीररीत्या कॅथोलिक धर्म स्वीकारला.
  • १७९७ : स्पेनच्या तेनेरीफ द्वीपांवरील हल्ल्यात होरेशियो नेल्सनने ३०० सैनिक व स्वतःचा उजवा हात गमावला.
  • १७९९ : नेपोलियन बोनापार्टने ईजिप्तमधील अबु किर जवळ ओट्टोमन सैन्याचा पराभव केला.
  • १८६१ : अमेरिकन यादवी युद्ध - अमेरिकन काँग्रेसने जाहीर केले की युद्ध हे गुलामगिरीच्या विरुद्ध नसून देशाची एकसंधता कायम ठेवण्यासाठी आहे.
  • १८६८ : वायोमिंगला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
  • १८९४ : पहिले चीन-जपान युद्ध सुरू.
  • १८९८ : अमेरिकेने पोर्तोरिकोवर आक्रमण केले.
  • १९०७ : कोरिया जपानच्या आधिपत्याखाली आले.
  • १९०८ : किकुने इकेदाने मोनोसोडियम ग्लुटामेट(आजिनोमोटो)चा शोध लावला.
  • १९०९ : लुई ब्लेरियोने प्रथम विमानातून इंग्लिश खाडी पार केली.
  • १९१७ : कॅनडात आयकर लागू.
  • १९२५ : सोवियेत संघाची वृत्तसंस्था तासची स्थापना.
  • १९३४ : ऑस्ट्रियाच्या चान्सेलर एंगेलबर्ट डॉलफसची हत्या.
  • १९४३ : दुसरे महायुद्ध - इटलीत बेनितो मुसोलिनीची हकालट्टी.
  • १९४४ : दुसरे महायुद्ध-ऑपरेशन स्प्रिंग - तुंबळ युद्धात ५,०२१ ठार, १३,०००पेक्षा जास्त जखमी.
  • १९५२ : पोर्तोरिकोने नवीन संविधान अंगिकारले.
  • १९५६ : अमेरिकेची प्रथम सागरी अणुचाचणी बिकीनी बेटांनजीक घेण्यात आली.
  • १९५६ : नान्टुकेट द्वीपाजवळ एस.एस. अँड्रीया डोरीया व एस.एस. स्टॉकहोमची धुक्यात टक्कर. अँड्रीया डोरीया बुडाले. ५१ मृत्युमुखी.
  • १९७३ : सोव्हिएत संघाचे मार्स ५ हे अंतराळयान प्रक्षेपित.
  • १९७८ : जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊन चा इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्म.
  • १९८४ : सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्तोस्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर.
  • १९९४ : इस्रायेल व जॉर्डनमधले १९४८पासूनचे युद्ध अधिकृतरीत्या समाप्त.
  • १९९५ : पॅरिसच्या उपनगरी रेल्वेत स्फोट. ८ ठार, ८० जखमी.
  • १९९७ : के.आर. नारायणन भारताच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९९९ : लान्स आर्मस्ट्रॉँगने आपली पहिली टुर दि फ्रांस सायकल शर्यत जिंकली.
  • २००० : एर फ्रांस फ्लाइट ४५९० हे कॉँकोर्ड विमान पॅरिस विमानतळावरून उडताच कोसळले. जमिनीवरील चौघांसह ११३ ठार.
  • २००७ : प्रतिभा पाटील भारताच्या राष्ट्रपतीपदी.

जन्म, वाढदिवस

  • ११०९ : अफोन्सो पहिला, पोर्तुगालचा राजा.
  • १५६२ : केटो कियोमासा, जपानी सामुराई.
  • १८४८ : आर्थर बॅलफोर, युनायटेड किंग्डमचा ३३वा पंतप्रधान.
  • १९०८ : बिल बोव्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९२९ : सोमनाथ चटर्जी, भारतीय राजकारणी.
  • १९७८ : लुईस ब्राऊन, पहिली मानव टेस्टट्यूब बेबी

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • ३०६ : कॉन्स्टान्शियस क्लोरस, रोमन सम्राट.
  • १४०९ : मार्टिन पहिला, सिसिलीचा राजा.
  • १४९२ : पोप इनोसंट आठवा.
  • १९३४ : एंगेलबर्ट डॉलफस, ऑस्ट्रियाचा चान्सेलर.
  • १९७३ : लुई स्टीवन सेंट लोरें, कॅनडाचा १२वा पंतप्रधान.

No comments:

Post a Comment