Thursday, 16 July 2015

13th JULY

१३ जुलै दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | १३ जुलै २०१३
१३ जुलै दिनविशेष(July 13 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
इंदिरा संत : इंदिरा संत (जानेवारी ४, १९१४, इंडी - जुलै १३, २०००, पुणे) या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे.

जागतिक दिवस

  • -

ठळक घटना, घडामोडी

  • १७९४ : व्हॉस्गेसची लढाई.
  • १८३२ : हेन्री रोव स्कूलक्राफ्टने मिसिसिपी नदीचे उगमस्थान शोधले.
  • १८६३ : सक्तीच्या सैन्यभरतीविरुद्ध न्यू यॉर्क शहरात दंगा.
  • १८७८ : १८७८चा बर्लिनचा तह - सर्बिया, मॉँटेनिग्रो व रोमेनिया ओट्टोमन साम्राज्यातून वेगळे झाले.
  • १९०८ : ऑलिंपिक स्पर्धांमध्ये स्त्रीयांना भाग घेण्यास परवानगी.
  • १९०९ : कॅनडातील कोक्रेन, ऑन्टारियो शहराजवळ जमिनीत सोने सापडले.
  • १९१२ : मौलाना अबुल कलाम आझादनी अल हिलाल या उर्दू भाषेतील नियतकालिकाचे प्रकाशन सुरू केले.
  • १९४१ : दुसरे महायुद्ध - मॉँटेनिग्रोत जर्मन वा इटालियन राजवटीविरुद्ध उठाव.
  • १९७७ : न्यू यॉर्कमधील वीजपुरवठा २५ तास खंडित. अंधारपटात लुटालुट, मारामारी व गुंडगिरीचा सुकाळ.
  • १९८३ : श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तमिळ व्यक्तींची हत्या. ४,००,०००हून अधिक तमिळ व्यक्तींचे युरोप व कॅनडा व भारतात पलायन.
  • २००५ : पाकिस्तानच्या घोट्की रेल्वे स्थानकात तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. १५० ठार.
  • २००६ : इस्रायेलने बैरुत विमानतळावर हल्ला चढवला.

जन्म, वाढदिवस

  • १०० : जुलियस सीझर, रोमन सेनापती व राज्यकर्ता, सीझर (जुलै १२ किंवा जुलै १३).
  • १५९० : पोप क्लेमेंट दहावा.
  • १६०८ : फर्डिनांड तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
  • १८०८ : पॅट्रिस मॅकमहोन, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९०४ : जे.आर.डी. टाटा, भारतीय उद्योगपती.
  • १९४० - पॅट्रिक स्टुअर्ट, इंग्लिश अभिनेता.
  • १९४२ : हॅरिसन फोर्ड, अमेरिकन अभिनेता.
  • १९४५ : ऍशली मॅलेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९५३ : लॅरी गोम्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९५४ : रे ब्राइट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९६४ : उत्पल चटर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • ९३९ : पोप लिओ सातवा.
  • १६६० : बाजीप्रभू देशपांडे.
  • १७६१ : तोकुगावा लेशिगे, जपानी शोगन.
  • १७९३ : ज्याँ पॉल मरात, फ्रेंच क्रांतीकारी.
  • १९८० : सेरेत्से खामा, बोत्स्वानाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
  • २००० : इंदिरा संत, मराठी कवयित्री.
arrow
close

No comments:

Post a Comment