17th JULY
१७ जुलै दिनविशेष
द्वारे स्वाती खंदारे | प्रकाशक संपादक मंडळ | १७ जुलै २०१३
१७ जुलै दिनविशेष(July 17 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
अॅडम स्मिथ : (५ जून १७२३ - १७ जुलै १७९०) अॅडम स्मिथ हा स्कॉटलंडचा तत्वज्ञ होता. राजकीय अर्थशास्त्राचा पाया त्याने रचल्याचे माने जाते.
जागतिक दिवस
- बाथ क्रांती दिन : इराक.
- लुइस मुनोझ रिव्हेरा जन्मदिन : पोर्तो रिको.
- संविधान दिन : दक्षिण कोरिया.
ठळक घटना, घडामोडी
- १०४८ : दमासस दुसरा पोपपदी.
- १२०३ : चौथी क्रुसेड - ख्रिश्चन सैन्याने कॉन्स्टेन्टिनोपल जिंकले.
- १७६२ : कॅथेरिन दुसरी रशियाच्या झारपदी.
- १७९१ : फ्रेंच क्रांती - शाँ दि मारची कत्तल. १,२०० ते १,५०० व्यक्तींची हत्या.
- १८०२ : मराठी भाषेतील पहिला छापील मजकुर मोडी लिपीत. देवी रोगावरील लस टोचून घेण्याविषयीची जाहिरात.
- १८१५ : नेपोलियन बोनापार्टने ब्रिटीश सैन्यासमोर शरणागती पत्करली.
- १८९७ : अलास्काच्या क्लॉन्डाइक भागात सोने शोधण्यासाठी गेलेली काही माणसे मुबलक सोन्याची वार्ता घेउन परतली आणि क्लॉन्डाइक गोल्ड रशची सुरुवात झाली.
- १९१७ : इंग्लंडचा राजा जॉर्ज पाचव्याने फतवा काढून जाहीर केले की त्याच्या वंशातील पुरूष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील.
- १९१८ : रशियाचा झार निकोलस दुसरा व त्याच्या कुटुंबाची हत्या.
- १९३६ : स्पॅनिश गृहयुद्धाला तोंड फुटले.
- १९४४ : अमेरिकेत पोर्ट शिकागो येथे दारुगोळ्याने भरलेल्या दोन जहाजांवर स्फोट. २३२ ठार.
- १९४५ : दुसरे महायुद्ध - पॉट्सडॅम संमेलनास सुरुवात.
- १९४७ : कोकण किनार्यावरील प्रवाशांची ने-आण करणार्या ‘रामदास’ या प्रचंड बोटीला जलसमाधी मिळून ६२५ मृत्युमुखी.
- १९५४ : कॅलिफोर्नियात डिस्नेलँड खुले.
- १९७५ : अमेरिकेचे अपोलो व रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.
- १९७६ : ईंडोनेशियाने पूर्व तिमोर बळकावले.
- १९७६ : कॅनडातील मॉँट्रिआल शहरात एकविसावे ऑलिंपिक खेळ सुरू.
- १९७९ : निकाराग्वाच्या राष्ट्राध्यक्ष जनरल अनास्तासियो सोमोझा देबेलने मायामी येथे पलायन केले.
- १९८१ : अमेरिकेतील कॅन्सास सिटी, मिसुरी येथे हॉटेलचा एक भाग कोसळला. ११४ ठार.
- १९८४ : लॉरें फाबियस फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९९४ : फुटबॉल विश्वकप अंतिम सामन्यात ब्राझिलने इटलीला पेनल्टी शूट-आउटमध्ये हरवले.
- १९९५ : अमेरिकेत उष्ण हवेची लाट. ४०० मृत्युमुखी.
- १९९६ : ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्स फ्लाइट ८०० हे बोईंग ७४७ प्रकारचे विमान न्यू यॉर्कजवळ समुद्रात कोसळले. २३० ठार.
- १९९८ : रशियाच्या झार निकोलस दुसरा व त्याच्या कुटुंबीयांना सेंट पीटर्सबर्ग येथे पुनर्दफन.
- १९९८ : पापुआ न्यू गिनीच्या किनाऱ्यावर त्सुनामी. १,५०० मृत्युमुखी, २,००० गायब.
- २००४ : भारतातील कुंभकोणम शहरात शाळेला आग लागली. ९० विद्यार्थी ठार.
- २००६ : ईंडोनेशिया जवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.२ तीव्रतेचा भूकंप. या नंतरच्या त्सुनामीत ८० व्यक्ती मृत्युमुखी.
- २००६ : टॅम एरलाइन्सचे टॅम एरलाइन्स फ्लाइट ३०५४ हे विमान साओ पाउलो विमानतळावर उतरताना कोसळले. अंदाजे १९९ ठार.
जन्म, वाढदिवस
- १४८७ : इस्माईल पहिला, पर्शियाचा शहा.
- १८३१ : शियानफेंग, चीनी सम्राट.
- १९१८ : कार्लोस मनुएल अराना ओसोरिया, ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२० : हुआन अँतोनियो समारांच, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचा अध्यक्ष.
- १९४१ : बॉब टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४९ : स्नायडर रिनी, सोलोमन द्वीपांचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५२ : डेव्हिड हॅसेलहॉफ, अमेरिकन अभिनेता.
- १९५४ : एंजेला मर्केल, जर्मनीची चान्सेलर.
- १९६३ : लेत्सी तिसरा, लेसोथोचा राजा.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- ९२४ : मोठा एडवर्ड, इंग्लंडचा राजा.
- १०८६ : कॅन्युट चौथा, डेन्मार्कचा राजा.
- १७९० : अॅडम स्मिथ, आधुनिक अर्थशास्त्रज्ञ.
- १९१८ : निकोलस दुसरा, रशियाचा झार (कुटुंबासह).
- २००५ : सर एडवर्ड हीथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- २०१२ : मृणाल गोरे, सहाव्या लोकसभेच्या सदस्य, समाजवादी कार्यकर्त्या
YOU MAY LIKE
चकवा
माणसाला नेहेमी पुर्वसुचना मिळत असतात. कधी आपल्या मनाकडुन तर कधी निसर्गाकडुन, पण बहुतांश लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि गोत्यात येतात.
- नवीन लेखन
- लोकप्रिय लेखन
- वाचकांचे अभिप्राय
पाऊस
विभाग मराठी कविता
स्त्रीशक्ती
विभाग मराठी कविता
पावसाळा नव्याने
विभाग मराठी कविता
आम्ही नोकरीवाल्या
विभाग मराठी लेख
उत्कृष्ट दहा
Legal - No Part of this Website, Including photocopy is permitted to copy or translate in any language, without prior permission in writing.
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
No comments:
Post a Comment