Monday, 15 June 2015

१५ जून दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | १५ जून २०१३
१५ जून दिनविशेष(June 15 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
किसन बाबूराव हजारे - ऊर्फ अण्णा हजारे (जून १५, इ.स. १९३७:भिंगार, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - हयात). मूळचे सैन्यात वाहनचालक असणारे किसन बाबुराव तथा अण्णा हजारे हे भारतातील एक ज्येष्ठ महाराष्ट्रीय समाजसेवक आहेत.

जागतिक दिवस

  • -

ठळक घटना, घडामोडी

  • ९२३ : सॉइसाँची लढाई - फ्रांसचा राजा रॉबर्ट पहिला मारला गेला.
  • ११८४ : फिमराइटची लढाई - नॉर्वेचा राजा मॅग्नुस पाचवा मारला गेला.
  • १२१५ : इंग्लंडच्या राजा जॉनने मॅग्ना कार्टा मान्य केले मारला गेला.
  • १३८९ : कोसोवोची लढाई - ऑट्टोमन सैन्याने सर्बिया व बॉस्नियाच्या सैन्याला हरवले.
  • १५२० : पोप लिओ दहाव्याने एक्सर्जे डॉमने हा पोपचा फतवा काढून मार्टिन ल्युथरला वाळीत टाकण्याची धमकी दिली.
  • १६६७ : डॉ.ज्याँ-बॅप्टिस्ट डेनिसने पहिल्यांदा मानवाला दुसर्‍याचे रक्त दिले.
  • १७५२ : बेंजामिन फ्रँकलिनने आकाशातील वीज ही वीज असल्याचे सिद्ध केले.
  • १७७५ : अमेरिकन क्रांती - जॉर्ज वॉशिंग्टनची खंडीय सेनेच्या नेतेपदी नेमणूक.
  • १८०४ : अमेरिकेच्या संविधानातील बारावा बदल स्वीकृत.
  • १८०८ : जोसेफ बोनापार्ट स्पेनच्या राजेपदी.
  • १८३६ : आर्कान्सा अमेरिकेची २५वे राज्य झाले.
  • १८४६ : ऑरेगोनचा तह - ४९० उत्तर अक्षांश अमेरिका व कॅनडामधील सीमा ठरवण्यात आली.
  • १८५९ : ऑरेगोनच्या तहाबद्दलच्या गैरसमजूतीमुळे अमेरिका व कॅनडाच्या नागरिकांत युद्ध.
  • १८८८ : विल्हेल्म दुसरा जर्मनीच्या कैसरपदी.
  • १९०४ : न्यू यॉर्कमध्ये एस.एस. जनरल स्लोकम या बोटीला आग लागून १,००० मृत्युमुखी.
  • १९११ : आय.बी.एम.च्या पूर्वज कंपनी टॅब्युलेटिंग कम्प्युटिंग रेकोर्डिंग कंपनीची स्थापना.
  • १९४४ : दुसरे महायुद्ध - सैपानची लढाई सुरू.
  • १९५४ : युएफाची स्थापना.
  • १९९२ : अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने ठरवले की अमेरिकेला हव्या असलेल्या संशयितांना इतर देशांतून पळवून आणणे कायदेशीर आहे.
  • २००२ : नियर अर्थ ऍस्टेरॉइड २००२ एम.एन. पृथ्वीपासून फक्त १,२०,००० कि.मी. (७५,००० मैल) दूरून गेला.

जन्म, वाढदिवस

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • १९३१ : अच्युत बळवंत कोल्हटकर, ‘संदेश’कार.
  • १९७१ : वेंडेल मेरेडिथ स्टॅनले, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ.

No comments:

Post a Comment