21st JUNE 2015 - WORLD YOGA DAY - INTERNATIONAL DAY OF
YOGA -
२१ जून - जागतिक योग दिन
२१ जून दिनविशेष
द्वारे स्वाती खंदारे | प्रकाशक संपादक मंडळ | २१ जून २०१३
२१ जून दिनविशेष(June 21 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
आंतरराष्ट्रीय योग दिवस/आंतरराष्ट्रीय योग दिन - आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल विधानसभा येथे आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आणि त्यानंतर २१ जून रोजी, ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून घोषित करण्यात आला.
जागतिक दिवस
- उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस.
- दक्षिण गोलार्धातील सर्वात छोटा दिवस.
- स्थानिक रहिवासी दिन : कॅनडा.
- राष्ट्र दिन : ग्रीनलँड.
- आंतरराष्ट्रीय योग दिवस/आंतरराष्ट्रीय योग दिन.
- पितृदिन/पितृदिवस
ठळक घटना, घडामोडी
- १७४९ : कॅनडाच्या नोव्हा स्कॉशिया प्रांतात हॅलिफॅक्स शहराची स्थापना.
- १७८८ : न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे नववे राज्य झाले.
- १८७७ : पेनसिल्व्हेनियात १० कामगार नेत्यांना फाशी देण्यात आली.
- १८९८ : गुआम अमेरिकेचा प्रांत झाला.
- १९४० : दुसरे महायुद्ध - फ्रांसने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
- १९४२ : दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्याने टोब्रुक जिंकले.
- १९४५ : दुसरे महायुद्ध - ओकिनावाची लढाई संपली.
- १९६४ : अमेरिकेत मिसिसिपी राज्यात समान हक्कांसाठी आंदोलन करणार्या ३ व्यक्तींना कु क्लुक्स क्लॅनने ठार मारले.
- १९७५ : वेस्ट ईंडीझने पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.
- १९८९ : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती ही वाचास्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.
- १९९१ : पी.व्ही. नरसिंह राव भारताच्या पंतप्रधानपदी.
- २००४ : स्पेसशिपवन या पहिल्या खाजगी अंतराळयानाचे पहिले उड्डाण.
जन्म, वाढदिवस
- १००२ : पोप लिओ नववा.
- १२२६ : बोलेस्लॉस पाचवा, पोलंडचा राजा.
- १७३२ : योहान क्रिस्चियन बाख, जर्मन संगीतकार.
- १७८१ : सिमिओन-डेनिस पॉइसॉन, फ्रेंच गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०५ : ज्यॉँ-पॉल सार्त्र, फ्रेंच लेखक व तत्त्वज्ञानी.
- १९२३ : सदानंद रेगे, मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक.
- १९३७ : जॉन एडरिच, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५३ : बेनझीर भुट्टो, पाकिस्तानची पंतप्रधान.
- १९५४ : जेरेमी कोनी, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९५५ : मिशेल प्लाटिनी, फ्रेंच फुटबॉल खेळाडू.
- १९८२ : विल्यम, इंग्लिश राजकुमार.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- १३०५ : वेंकेस्लॉस दुसरा, पोलंडचा राजा.
- १३७७ : एडवर्ड तिसरा, इंग्लंडचा राजा.
- १५२७ : निकोलो माकियाव्हेली, इटलीचा राजकारणी, इतिहासकार.
- १८७४ : अँडर्स योनास अँग्स्ट्रॉम, स्वीडीश भौतिकशास्त्रज्ञ.
- १८९३ : लिलँड स्टॅनफोर्ड, अमेरिकन उद्योगपती; स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचा संस्थापक.
- १९२८ : नाथमाधव तथा द्वारकानाथ माधव पितळे, मराठी कादंबरीकार.
- १९४० : केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक.
- १९५७ : योहानेस श्टार्क, नोबेल पारितोषिकविजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९७० : सुकर्णो, इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९८४ : अरुण सरनाईक, मराठी चित्रपट अभिनेता.
- १९८५ : टेग अर्लँडर, स्वीडनचा पंतप्रधान.
लॉंग ड्राईव्ह
एक पौर्णिमेच्या रात्री केलेली लॉंग ड्राइव जय आणि सरिताच्या अशी काही अंगाशी आली की ती रोमॅंटिक न ठरता कशी जीवघेणी ठरली याची ही कहाणी.
- नवीन लेखन
- लोकप्रिय लेखन
- वाचकांचे अभिप्राय
उत्कृष्ट दहा
Legal - No Part of this Website, Including photocopy is permitted to copy or translate in any language, without prior permission in writing.
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
No comments:
Post a Comment