30th JUNE 2015 TODAY IN HISTORY- DINVISHESH
३० जून दिनविशेष
द्वारे स्वाती खंदारे | प्रकाशक संपादक मंडळ | ३० जून २०१३
३० जून दिनविशेष(June 30 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
दादाभाई नौरोजी - (४ सप्टेंबर १८२५ - ३० जून १९१७) हे पारशी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी अँड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया (अर्थ: भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी) या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनाकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले. इ.स. १८९२ ते इ.स. १८९५ या कालखंडात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहात संसदसदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय ए.ओ. ह्यूम व दिनशा एडलजी वाच्छा यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते
जागतिक दिवस
- स्वातंत्र्य दिन : कॉँगो.
ठळक घटना, घडामोडी
- १७५८ : डॉमस्टाटलची लढाई.
- १८०५ : मिशिगनला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
- १९०५ : अल्बर्ट आईनस्टाईन यांनी त्यांचा क्रांतिकारक सापेक्षतेचा सिद्धांत मांडला.
- १९०८ : तुंगस्का स्फोट.
- १९३४ : ऍडोल्फ हिटलरने आपल्या राजकीय प्रतीस्पर्ध्यांना तुरुंगात टाकले वा ठार मारले.
- १९३६ : गॉन विथ द विंड ही कादंबरी प्रकाशित.
- १९५६ : युनायटेड एरलाइन्स फ्लाइट ७१८ हे डी.सी.७ प्रकारचे व ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सचे सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारचे विमान अमेरिकेतील अॅरिझोना राज्यात ग्रँड कॅन्यन वर एकमेकांवर आदळली. १२८ ठार.
- १९६० : कॉँगोला बेल्जियमपासून स्वातंत्र्य.
- १९७१ : सोवियेत संघाच्या सोयुझ ११ अंतराळयानास अपघात. ३ अंतराळवीर मृत्युमुखी.
- १९७८ : अमेरिकेच्या संविधानातील २६वा बदल संमत. मतदानाचे वय १८ वर्षे.
- १९९७ : हाँग काँग चीनच्या आधिपत्याखाली.
- २००२ : ब्राझिलने फुटबॉल विश्वकप जिंकला.
- २००५ : स्पेनमध्ये समलिंगी लग्नास मुभा.
जन्म, वाढदिवस
- १४७० : चार्ल्स आठवा, फ्रांसचा राजा.
- १९३३ : माईक स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४१ : पीटर पॉलॉक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९५४ : पिएर चार्ल्स, डॉमिनिकाचा पंतप्रधान.
- १९६६ : माईक टायसन, अमेरिकन मुष्टियोद्धा.
- १९६९ : सनत जयसुर्या, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७३ : दोड्डा गणेश, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- १९१७ : दादाभाई नौरोजी, भारतीय नेता व अर्थशास्त्रज्ञ.
- १९१९ : जॉन विल्यम स्टूट रॅले, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९३४ : चिंतामणी नागेश रामचंद्र राव, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.
- १९३४ : कर्ट फोन श्लाइशेर, जर्मनीचा चान्सेलर.
- १९९४ : बाळ कोल्हटकर, महान नाटककार व अभिनेते.
YOU MAY LIKE
लॉंग ड्राईव्ह
एक पौर्णिमेच्या रात्री केलेली लॉंग ड्राइव जय आणि सरिताच्या अशी काही अंगाशी आली की ती रोमॅंटिक न ठरता कशी जीवघेणी ठरली याची ही कहाणी.
- नवीन लेखन
- लोकप्रिय लेखन
- वाचकांचे अभिप्राय
सर्वपित्री अमावस्या
विभाग मराठी कथा
भेट तुझी माझी
विभाग मराठी कविता
उत्कृष्ट दहा
Legal - No Part of this Website, Including photocopy is permitted to copy or translate in any language, without prior permission in writing.
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
No comments:
Post a Comment