27th JUNE TODAY IN HISTORY- DINVISHESH
२७ जून दिनविशेष
द्वारे स्वाती खंदारे | प्रकाशक संपादक मंडळ | २७ जून २०१३
२७ जून दिनविशेष(June 27 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
ए.टी.एम. - (ATM - Automated Teller Machine) बँकेच्या चार भिंतींबाहेर, ग्राहकास आपल्या खात्यावरील रक्कम कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय काढून देणारे संगणकीकृत दूरसंचारयंत्र म्हणजे धनयंत्र किंवा एटीएम्. ग्राहकाच्या बँक खात्याशी या धनपत्राची संगती जोडलेली असते. ग्राहकाची ओळख पटविण्याकरिता त्याला दिलेल्या धनपत्रासोबत एक पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर (PIN) दिलेला असतो. वैध धनपत्र व योग्य PIN असेल तरच व्यवहार पूर्णत्वास जातो.
जागतिक दिवस
- एच.आय.व्ही. चाचणी दिन : अमेरिका
ठळक घटना, घडामोडी
- ६७८ : संत अगाथो पोपपदी.
- १५४२ : हुआन रॉद्रिगेझ काब्रियोने कॅलिफोर्नियावर स्पेनचे आधिपत्य जाहीर केले.
- १७०९ : पीटर पहिल्याने चार्ल्स बाराव्याचा पराभव केला.
- १८०६ : ब्रिटीश सैन्याने आर्जेन्टिनाची राजधानी बोयनोस एर्स जिंकली.
- १८४४ : मोर्मोन चर्चच्या संस्थापक जोसेफ स्मिथ ज्युनियरचा कार्थेज, इलिनॉय येथे तुरुंगात खून.
- १९५३ : जोसेफ लेनियेल फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९५७ : अमेरिकेच्या टेक्सास व लुईझियाना राज्यात हरिकेन ऑड्रीचा धुमाकूळ. ५०० ठार.
- १९६७ : लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. (Automated teller machine) सुरू.
- १९७७ : जिबुटीला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९८० : एरोलिनी इटाव्हिया फ्लाइट ८७० हे डी.सी.८ प्रकारचे विमान इटलीत युस्टीका शहराजवळ कोसळले. ८१ ठार.
- १९८८ : फ्रांसच्या गॅरे दि ल्यॉँ रेल्वे स्थानकात दोन रेल्वे गाड्यांची टक्कर. ५९ ठार, ५५ जखमी.
- १९९१ : युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.
- १९९८ : कुआलालम्पुर विमानतळ खुला.
- २००७ : युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी राजीनामा दिला.
जन्म, वाढदिवस
- १०४० : लाडिस्लॉस पहिला, हंगेरीचा राजा.
- १३५० : मनुएल दुसरा पॅलिओलॉगस, पूर्व रोमन सम्राट.
- १४६२ : लुई बारावा, फ्रांसचा राजा.
- १५५० : चार्ल्स नववा, फ्रांसचा राजा.
- १८६४ : शिवराम महादेव परांजपे, ‘काळ’ या वृत्तपत्राचे संपादक व प्रखर राष्ट्रीय नेते.
- १८६९ : हान्स श्पेमान, जर्मन प्राणीशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९१७ : खंडेराव रांगणेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२४ : रॉबर्ट ऍपलयार्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३० : रॉस पेरो, अमेरिकन उद्योगपती व राजकारणी.
- १९५१ : मेरी मॅकअलीस, आयरिश राष्ट्राध्यक्ष.
- १९६३ : मीरा स्याल, ब्रिटीश लेखिका, अभिनेत्री.
- १९८० : केव्हिन पीटरसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८३ : डेल स्टाइन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८५ : स्वेतलाना कुझ्नेत्सोवा, रशियाची टेनिस खेळाडू.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- ११४९ : अँटिओखचा रेमंड.
- १४५८ : आल्फोन्से पाचवा, अरागॉनचा राजा.
- १८३९ : रणजितसिंग, पंजाबातील शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक.
- १८४४ : जोसेफ स्मिथ ज्युनियर, मोर्मोन चर्चचा संस्थापक.
- १९९९ : जॉर्ज पापादुपॉलस, ग्रीसचा हुकुमशहा.
- २००८ : सॅम माणेकशा, भारताचे फिल्ड मार्शल.
YOU MAY LIKE
लॉंग ड्राईव्ह
एक पौर्णिमेच्या रात्री केलेली लॉंग ड्राइव जय आणि सरिताच्या अशी काही अंगाशी आली की ती रोमॅंटिक न ठरता कशी जीवघेणी ठरली याची ही कहाणी.
- नवीन लेखन
- लोकप्रिय लेखन
- वाचकांचे अभिप्राय
उत्कृष्ट दहा
Legal - No Part of this Website, Including photocopy is permitted to copy or translate in any language, without prior permission in writing.
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
No comments:
Post a Comment