Friday 7 August 2015

7th AUGUST 

७ ऑगस्ट दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | ७ ऑगस्ट २०१३
७ ऑगस्ट दिनविशेष(August 7 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
रवींद्रनाथ टागोर - उर्फ रवींद्रनाथ ठाकूर (बंगाली: রবীন্দ্রনাথ ঠাকুর उच्चार: रोबीन्द्रनाथ ठाकूर) (मे ७, इ.स. १८६१ - ऑगस्ट ७, इ.स. १९४१) ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियाचे पहिले नोबेलविजेते होते.

जागतिक दिवस


  • स्वातंत्र्य दिन : कोट दि आयव्होर.
  • मुक्ती दिन : टर्क्स व कैकोस द्वीप.

ठळक घटना, घडामोडी


  • १७९४ : व्हिस्की क्रांती - अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील शेतकर्‍यांनी व्हिस्की व अन्य गाळीव मद्यावरील कराविरुद्ध आंदोलन सुरू केले.
  • १८१९ : बॉयाकाची लढाई - सिमोन बॉलिव्हारच्या सैन्याने स्पेनच्या सैन्याचा पाडाव केला.
  • १८८८ : लंडनमध्ये जॅक द रिपरने पहिला खून केला.
  • १९४२ : दुसरे महायुद्ध - ग्वादालकॅनालची लढाई सुरू.
  • १९४५ : दुसरे महायुद्ध - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने जपानच्या हिरोशिमा शहरावरील परमाणुबॉम्ब हल्ला सफल झाल्याचे जाहीर केले.
  • १९४७ : थॉर हायरडाल व त्याच्या चमूने बाल्सा लाकडाच्या तराफ्यातून १०१ दिवसात पॅसिफिक समुद्र पार केला.
  • १९४७ : मुंबई महापालिकेने बेस्ट कंपनी आपल्या अधिकारात घेतली.
  • १९६० : कोट दि आयव्होरला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • १९६४ : व्हियेतनाम युद्ध - अमेरिकन काँग्रेसने टोंकिनच्या अखातातील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्राध्यक्षलिंडन बी. जॉन्सनला सर्वाधिकार दिले.
  • १९६५ : सिंगापुरची मलेशियामधून हकालपट्टी.
  • १९६७ : व्हियेतनाम युद्ध - चीनने उत्तर व्हियेतनामला मदत करण्याचे जाहीर केले.
  • १९७६ : व्हायकिंग २ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत आले.
  • १९९१ : सामान्य माणसांना वर्ल्ड वाइड वेब उपलब्ध.
  • १९९७ : फाइन एर फ्लाइट १०१ हे मालवाहू विमान फ्लोरिडातील मायामी शहरात कोसळले. ५ ठार.
  • १९९८ : टांझानिया व केन्यामधील अमेरिकन वकिलातींवर दहशतवाद्यांचा बॉम्बहल्ला. २२४ ठार, ४,५०० जखमी.

जन्म, वाढदिवस


  • ३१७ : कॉन्स्टेन्टियस दुसरा, रोमन सम्राट.
  • १८१६ : माटा हारी, डच गुप्तहेर.
  • १९२५ : एम.एस. स्वामीनाथन, भारतीय शेतीतज्ञ.
  • १९३७ : डॉन विल्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९४० : ज्यॉँ-लुक डेहेन, बेल्जियमचा पंतप्रधान.
  • १९४८ : ग्रेग चॅपल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू व मार्गदर्शक.
  • १९५९ : अली शाह, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६६ : जिमी वेल्स, विकिपिडीयाचा स्थापक.
  • १९७१ : डॉमिनिक कॉर्क, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ४६१ : माजोरियन, रोमन सम्राट.
  • ४७९ : युराकु, जपानी सम्राट.
  • ११०६ : हेन्री चौथा, पवित्र रोमन सम्राट.
  • १८५५ : मेरियानो अरिस्ता, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४१ : रवींद्रनाथ टागोर, बंगाली कवी, लेखक, नोबेल पारितोषिक विजेता.
  • १९७३ : जॅक ग्रेगरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • २००४ : रेड अडेर, अमेरिकेचा अग्निशमनतज्ञ.
  • २००५ : पीटर जेनिंग्स, अमेरिकेचा वार्ताहर.

No comments:

Post a Comment