Monday 3 August 2015

2nd AUGUST 

२ ऑगस्ट दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | २ ऑगस्ट २०१३
२ ऑगस्ट दिनविशेष(August 2 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
प्रफुल्लचंद्र रे - डॉक्टर प्रफुल्लचंद्र राय (मराठी लेखनभेद: प्रफुल्लचंद्र रे; बंगाली: প্রফুল্লচন্দ্র রায় ;) (ऑगस्ट २, इ.स. १८६१ - जून १६, इ.स. १९४४) हे बंगाली रसायनशास्त्रज्ञ, उद्योजक शिक्षक होते. 'बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स' या भारतातील पहिली औषधनिर्मिती कंपनी त्यांनी स्थापली.

जागतिक दिवस


  • वायु सेना दिन : रशिया.

ठळक घटना, घडामोडी


  • १७९० : अमेरिकेतील पहिली जनगणना सुरू.
  • १८६९ : जपानमधील वर्णसंस्थेचा शेवट.
  • १९१६ : पहिले महायुद्ध - इटलीची लिओनार्डो दा व्हिन्ची ही युद्धनौका बुडाली.
  • १९३४ : ऍडोल्फ हिटलर जर्मनीच्या फ्युररपदी.
  • १९४५ : दुसरे महायुद्ध - पॉट्ट्सडॅम संमेलनाची सांगता.
  • १९८० : इटलीतील बोलोन्या शहराच्या रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट. ८५ ठार, २०० जखमी.
  • १९८५ : डेल्टा एरलाइन्सचे एल.१०११ प्रकारचे विमान अमेरिकेतील डॅलस आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३७ ठार.
  • १९९० : इराकने कुवैतवर आक्रमण केले.
  • २००५ : एर फ्रांस फ्लाइट ३५८ हे एरबस ए.३०० प्रकारचे विमान कॅनडातील टोरोंटो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर धावपट्टीवरुन घसरले. विमान नष्ट परंतु सर्व प्रवासी बचावले.

जन्म, वाढदिवस


  • १६९६ : महमूद पहिला, ओट्टोमन सम्राट.
  • १८६१ : प्रफुल्लचंद्र रे, बंगाली रसायनशास्त्रज्ञ
  • १८६८ : कॉन्स्टन्टाईन पहिला, ग्रीसचा राजा.
  • १९२८ : माल्कम हिल्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३२ : पीटर ओटूल, आयरिश अभिनेता.
  • १९५८ : अर्शद अय्युब, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९७६ : मोहम्मद झहीद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ६८६ : पोप जॉन पाचवा.
  • ११०० : विल्यम दुसरा, इंग्लंडचा राजा.
  • १५८९ : तिसरा हेन्री, फ्रान्सचा राजा.
  • १६११ : केटो कियोमासा, जपानी सामुराई.
  • १९२३ : वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष.

No comments:

Post a Comment