14th AUGUST
१४ ऑगस्ट दिनविशेष
द्वारे स्वाती खंदारे | प्रकाशक संपादक मंडळ | १४ ऑगस्ट २०१३
१४ ऑगस्ट दिनविशेष(August 14 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
खाशाबा जाधव - (जानेवारी १५, इ.स. १९२६ - ऑगस्ट १४, इ.स. १९८४) हे ऑलिंपिकपदकविजेते मराठी, भारतीय कुस्तीगीर होते. इ.स. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते.
जागतिक दिवस
- स्वातंत्र्य दिन : पाकिस्तान.
- ध्वज दिन : पेराग्वे.
ठळक घटना, घडामोडी
- १०४० : मॅकबेथने स्कॉटलंडचा राजा डंकन पहिल्याची हत्या केली. शेक्सपियरने लिहिलेल्या मॅकबेथ नाटकातील प्रमुख पात्र यावर आधारित आहे.
- १८४० : दुसरे सेमिनोल युद्ध - अमेरिकेतील सेमिनोल जमातीचा पराभव व फ्लोरिडातून ओक्लाहोमा येथे सक्तीचे स्थलांतर.
- १८४८ : ओरेगॉनला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
- १९१२ : अमेरिकेच्या सैन्याने निकाराग्वावर आक्रमण केले.
- १९२१ : तन्नु तुव्हा या राष्ट्राची रचना.
- १९४५ : जपानने दोस्त राष्ट्रांची शरणागतीची कलमे मान्य केली.
- १९४७ : पाकिस्तानला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७१ : बहरैनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७२ : पूर्व जर्मनीचे आय.एल. ६२ प्रकारचे विमान पूर्व बर्लिनच्या विमानतळावर कोसळले. १५६ ठार.
- १९८० : लेक वालेंसाने ग्डान्स्क जहाजबांधणी केंद्रातील संप पुकारला.
- १९९४ : इलिच रामिरेझ सांचेझ तथा कार्लोस द जॅकल पकडला गेला.
- २००५ : हेलियोस एरवेझ फ्लाइट ५२२ हे बोईंग ७३७ प्रकारचे विमान अथेन्स जवळ कोसळले. १२१ ठार.
- २००६ : इस्रायेल व लेबेनॉनमध्ये युद्धबंदी लागू.
जन्म, वाढदिवस
- १२९७ : हानाझोनो, जपानी सम्राट.
- १६८८ : फ्रेडरिक विल्यम पहिला, रशियाचा राजा.
- १७४० : पोप पायस सातवा.
- १७७१ : सर वॉल्टर स्कॉट, इंग्लिश ऐतिहासिक कादंबरीकार.
- १७७७ : फ्रांसिस पहिला, सिसिलीचा राजा.
- १८७६ : अलेक्झांडर ओब्रेनोविच, सर्बियाचा राजा.
- १८९३ : ऑस्कार चार्ल्स स्कॉट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १८९५ : जॅक ग्रेगरी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९०९ : लेन डार्लिंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९११ : वेदतिरी महारिषी, भारतीय तत्त्वज्ञानी.
- १९२५ : जयवंत दळवी, मराठी लेखक, नाटककार.
- १९६२ : रमीझ राजा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६६ : सईद आझाद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६८ : प्रवीण आम्रे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७१ : प्रमोद विक्रमसिंगे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- ५८२ : तिबेरियस दुसरा कॉन्स्टन्टाईन, बायझेन्टाईन सम्राट.
- १४३३ : होआव पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १४६४ : पोप पायस दुसरा.
- १९३८ : ह्यू ट्रंबल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९८४ : खाशाबा जाधव, भारतीय कुस्तीगीर.
- १९८८ : आंझो फेरारी, इटालियन कार उत्पादक.
- २००४ : चेस्लॉ मिलॉझ, नोबेल पारितोषिक विजेता पोलिश लेखक.
- २००६ : ब्रुनो कर्बी, अमेरिकन अभिनेता.
YOU MAY LIKE
स्वातंत्र्याची ६८ वर्षे
आपल्याला महान आणि तडफदार नेते, राजकारण्यांचा इतिहास आहे. पण खेद याचा वाटतो की, या इतिहासाची पुनरावृत्ती होत नाहिये.
- नवीन लेखन
- लोकप्रिय लेखन
- वाचकांचे अभिप्राय
उपयुक्त दुवे
Legal - No Part of this Website, Including photocopy is permitted to copy or translate in any language, without prior permission in writing.
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
No comments:
Post a Comment