Friday 14 August 2015

13th AUGUST

१३ ऑगस्ट दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | १३ ऑगस्ट २०१३
१३ ऑगस्ट दिनविशेष(August 13 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
१३ ऑगस्ट दिनविशेष | August 13 in History
विक्रम साराभाई - विक्रम अंबालाल साराभाई (गुजराती: વિક્રમ અંબાલાલ સારાભાઇ) (१३ ऑगस्ट, इ.स. १९१९ - ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • १७९२ - फ्रांसच्या राजघराण्यातील व्यक्तींना क्रांतीकारकांनी पकडून तुरुंगात टाकले.
  • १९४० - जर्मनांनी या दिवसाला 'गरुडदिन' असे नाव दिले होते. कारण या दिवशी ब्रिटनच्या हवाईदलात एकही विमान शिल्लक असणार नाही, असे गोलरिंगने जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र तसे काहीच घडले नाही. बरीच जर्मन विमाने पाडण्यात ब्रिटिश हवाई दलाला यश आले.
  • १९४२ - न्युर्यॉकमध्ये बांबी या चित्रपटाचे प्रथम प्रदर्शन. वॉल्ट डिस्नेच्या या अजरामर निर्मितीचा पहिला खेळ रेडियो सिटी म्युझिक हॉलमध्ये झाला.
  • १९४३ - रिझर्व्ह बॅंकेचे पहिले भारतीय संचालक म्हणून सी. डी. देशमुंखांची नियुक्ती.
  • १९४५ - जपान शरण येत नाही, असे दिसताच अमेरिकी विमानांनी टोकियोवर प्रचारपत्रकांचा वर्षाव केला.
  • १९६१ - ईस्ट जर्मनीने सीमा बंद केल्या . बर्लिन भिंतीचे बांधकाम सुरु.
  • १९९१ - ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि आधुनिक भारतीय साहित्य क्षेत्रातील एक उत्तूंग व्यक्तिमत्व प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
  • २००० - पाकिस्तानातील पॉप गायिका नाझिया हसन यांचे निधन.
  • २००२ - के. के. बिर्ला या उद्योगपतीस कांचीपूरम येथे विद्यासेवारत्न सन्मान प्रदान केला गेला.
  • २००३ - ज्येष्ठ कलादिग्दर्शक केशव दत्तात्रय तथा दादा महाजनी यांचे निधन . मराठी चित्रपटांच्या सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शनासाठी त्यांना पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
  • २००४ - नागपूरमध्ये संतापलेल्या स्त्रियांनी अक्कू यादव या गुंडाला न्यायालयाच्या आवारात घेरुन ठार मारले.
  • २००४ - जगातील एक सर्वात पुरातन संस्कृती असलेल्या ग्रीसच्या राजधानी अथेन्समध्ये शतकातील पहिल्या ऑल्ंिापिकला जल्लोषात प्रारंभ झाला. ग्रीक संस्कृती, देव -देवता याबरोबरच ऑल्ंिापिकची जन्मगाथा यांच्या जोडीला पॉपचाही समावेश असलेल्या संगीत व नृत्य कार्यक्रमांनी उपस्थित प्रेक्षकांबरोबरच जगभरातील सुमारे तीनशे दूरचीत्रवाणी वाहिन्यांवर अंदाजे चार अब्ज क्रीडाप्रेमींना या सोहळयाने मोहित केले.

जन्म, वाढदिवस


  • १८७२ - रिर्चड क्लिस्टॅटर, क्लोरोफिलच्या कार्याचे स्पष्टीकरण करून १९१५ चे नोबेल पारितोषिक मिळविणारा जीवशास्त्रज्ञ.
  • १८८० - जॉन लोगी बेअर्ड, दूरचित्रवाणीसंचशोधक.
  • १८९० - त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी, मराठी कवी.
  • १८९८ - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मराठी साहित्यिक.
  • १८९९ - अल्फ्रेड हिचकॉक, इंग्लिश चित्रपटदिग्दर्शक.
  • १८९८ - विश्राम बेडेकर, मराठी साहित्यिक.
  • १९२३ - पंडित काशिनाथशास्त्री जोशी, भागवत अभ्यासक, प्रवचनकार.
  • १९२७ - फिडेल कॅस्ट्रो, क्युबाचा हुकुमशहा.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १७९५ - अहल्याबाई होळकर.
  • १९१० - क्रिमियन युद्धात सैनिकांनी देवदूत मानलेल्या फ्लॉरेन्स नाईटिंगेलचे निधन.
  • १९४६ - एच. जी. वेल्स या साहित्यिकाचे निधन.
  • १९८० - लेखक पुरुषोत्तम भास्कर भावे यांचे निधन. 'प्रथमपुरुषी एकवचनी' हे त्यांचे आत्मचरित्र. 'रक्त आणि अश्रू' हा लेखसंग्रह, 'विषकन्या', 'स्वामीनी', 'महाराणी पह्यिमी' ही त्यांची नाटके गाजली.
  • १९८८ - व दिग्दर्शक गजानन जागीरदार यांचे निधन. पुण्याच्या चित्रपट आणि दूरदर्शन प्रशिक्षण संस्थेचे ते पहिले प्राचार्य होते.

No comments:

Post a Comment