Wednesday, 5 August 2015

4th AUGUST 

४ ऑगस्ट दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | ४ ऑगस्ट २०१३
४ ऑगस्ट दिनविशेष(August 4 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
ना. सी. फडके - नारायण सीताराम फडके (ऑगस्ट ४, १८९४ - ऑक्टोबर २२, १९७८) हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते. ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. इ.स. १९४९मध्ये ते येथून निवृत्त झाले. ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत.

जागतिक दिवस


  • क्रांती दिन : बर्किना फासो.
  • संविधान दिन : कूक द्वीपसमूह.

ठळक घटना, घडामोडी


  • १५७८ : अल कस्र अल कबिरच्या लढाईत पोर्तुगालचा राजा सेबास्टियाव पहिला मृत्युमुखी.
  • १६९३ : दॉम पेरिन्यॉँने आपले विशिष्ट शॅम्पेन प्रकारचे मद्य तयार करण्यास सुरुवात केली.
  • १७८९ : फ्रांसच्या राष्ट्रीय सभेने जहागिरदारीची पद्धत बंद करण्याचे ठरवले.
  • १८२४ : कोसची लढाई.
  • १९१४ : पहिले महायुद्ध - जर्मनीने बेल्जियमवर चढाई केली. प्रत्युत्तरादाखल युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. अमेरिकेने तटस्थ असल्याचे जाहीर केले.
  • १९२३ : नागपूर विद्यापीठाची स्थापना.
  • १९४४ : ज्यूंचे शिरकाण - गेस्टापोने ऍन फ्रँक व तिच्या कुटुंबास अटक केली.
  • १९४७ : जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना.
  • १९६४ : व्हियेतनाम युद्ध - अमेरिकेच्या यु.एस.एस. मॅडोक्स व यु.एस.एस. सी. टर्नर जॉय या दोन युद्धनौकांवर हल्ला झाल्याचे वृत्त. येथून युद्धास गंभीर वळण लागले. अनेक वर्षांनी असे सिद्ध झाले की हा हल्ला झालाच नव्हता.
  • १९८३ : थॉमस संकरा बर्किना फासोच्या (तेव्हाचे अपर व्होल्टा) राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९८४ : अपर व्होल्टाने आपले नाव बदलुन बर्किना फासो असे ठेवले.
  • १९९१ : क्रुझ शिप ओशनोस दक्षिण आफ्रिकेजवळ बुडाली. बरेचसे खलाशी व अधिकाऱ्यांनी पळ काढला. सगळ्या ५७१ प्रवाश्यांना वाचवण्यात यश आले.
  • १९९३ : टॅक्सीचालक रॉडनी किंगच्या मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याबद्दल लॉस एंजेल्सच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना ३० महिन्याची कैद.
  • २००६ : आनंद सत्यानंद न्यू झीलँडच्या गव्हर्नर-जनरलपदी.

जन्म, वाढदिवस


  • १५२१ : पोप अर्बन सातवा.
  • १७९२ : पर्सी शेली, इंग्लिश कवी.
  • १८०५ : विल्यम रोवन हॅमिल्टन, आयरिश गणितज्ञ.
  • १८३५ : जॉन व्हेन, इंग्लिश गणितज्ञ.
  • १८९४ : ना. सी. फडके, प्रसिद्ध कथा-कादंबरीकार.
  • १९२९ : किशोर कुमार, भारतीय अभिनेता, पार्श्वगायक.
  • १९३१ : नरेन ताम्हाणे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९४० : अब्दुर्रहमान वहीद, इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४२ : डेव्हिड लँग, न्यू झीलँडचा पंतप्रधान.
  • १९५५ : बिली बॉब थॉर्न्टन, अमेरिकन अभिनेता.
  • १९६० : होजे लुइस रोद्रिगेझ झपातेरो, स्पेनचा पंतप्रधान.
  • १९६१ : बराक ओबामाअमेरिकन राजकारणी.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १०६० : हेन्री पहिला, फ्रांसचा राजा.
  • १३०६ : वेंकेस्लॉस तिसरा, बोहेमियाचा राजा.
  • १५७८ : सेबास्टियाव पहिला, पोर्तुगालचा राजा.
  • १८७५ : हॅन्स अ‍ॅंडरसन्स, प्रसिद्ध परिकथा लेखक.
  • १९१९ : डेव्हिड ग्रेगरी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९५७ : वॉशिंग्टन लुइस परेरा दि सूसा, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९६७ : पीटर स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

No comments:

Post a Comment