Saturday 12 September 2015

11th SEPTEMBER TODAY IN HISTORY - DINVISHESH GHADAMODI

११ सप्टेंबर दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | ११ सप्टेंबर २०१३
११ सप्टेंबर दिनविशेष(September 11 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
वर्ल्ड ट्रेड सेंटर - २००१ साली झालेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी पडले.

जागतिक दिवस


  • राष्ट्र दिन : कॅटेलोनिया.
  • शिक्षक दिन : लॅटिन अमेरिका.
  • राष्ट्रभक्त दिन : अमेरिका.

ठळक घटना, घडामोडी


  • १२९७ : स्टर्लिंग ब्रिजची लढाई - विल्यम वॉलेसच्या स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव केला.
  • १५४१ : मिचिमालोंकोच्या नेतृत्त्वाखाली स्थानिक रहिवाश्यांनी सांटियागो, चिली उद्ध्वस्त केले.
  • १६०९ : हेन्री हडसन पहिल्यांदा मॅनहॅटनला पोचला.
  • १७७३ : बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स बाय व्हिच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला.
  • १७७७ : अमेरिकन क्रांती-ब्रँडीवाइनची लढाई.
  • १७९२ : होप हिरा चोरला गेला.
  • १८५७ : माउंटन मेडोझची कत्तल - मोर्मोन पंथील लोकांनी १२० पायोनियर्सची कत्तल केली.
  • १८९७ : मेनेलेक दुसर्‍याच्या सैन्याने काफ्फाच्या राजा गाकी शेरोचोला पकडले व त्याचे राज्य बळकावले.
  • १९०६ : महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.
  • १९१९ : अमेरिकेने होन्डुरास वर चढाई केली.
  • १९४० : दुसरे महायुद्ध - जर्मनीने केलेल्या बॉम्बफेकीत बकिंगहॅम पॅलेसची पडझड.
  • १९४१ : अमेरिकेने पेंटेगॉन बांधायला सुरुवात केली.
  • १९४२ : सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेनेनेजन गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले.
  • १९४३ : दुसरे महायुद्ध - जर्मनीने कॉर्सिका आणि कोसोव्हो बळकावले.
  • १९४३ : दुसरे महायुद्ध - जर्मनीने मिन्स्क आणि लिडामधील ज्यू राहत असलेले भाग रिकामे करवले.
  • १९४४ : दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रे पश्चिमेकडून जर्मनीत घुसली.
  • १९४४ : दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे ११,५०० नागरिक ठार.
  • १९४५ : दुसरे महायुद्ध - ऑस्ट्रेलियाच्या सैन्याने बाटु लिंटांग येथील युद्धकैदी व इतर बंदी असलेला तुरुंग मुक्त केला. तेथील २,००० कैद्यांना १५ तारखेस ठार मारण्याची जपान्यांची योजना होती.
  • १९६१ : वर्ल्ड वाइल्डलाइफ फंडची स्थापना.
  • १९६८ : एर फ्रांस फ्लाइट १६११ हे विमान फ्रांसच्या नीस शहराजवळ कोसळले.
  • १९७३ : चिलीमध्ये जनरल ऑगुस्तो पिनोशेने सी.आय.ए.च्या मदतीने साल्वादोर आयेंदेचे सरकार उलथवले.
  • १९७४ : ईस्टर्न एरलाइन्स फ्लाइट २१२ हे विमान शार्लट, उत्तर कॅरोलिना येथे कोसळले. ६९ ठार.
  • १९८० : चिलीने नवीन संविधान अंगिकारले.
  • १९९७ : नासाचे मार्स ग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोचले.
  • २००१ : वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.
  • २००७ : रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.

जन्म, वाढदिवस


  • १८१६ : कार्ल झाइस, जर्मन संशोधक.
  • १८६२ : ओ. हेन्री, इंग्लिश लेखक.
  • १८८५ : डी.एच. लॉरेन्स, इंग्लिश लेखक.
  • १८९५ : आचार्य विनोबा भावे, भूदान चळवळीचे प्रणेते.
  • १९०१ : अनिल उर्फ कवि अनिल.
  • १९१७ : फर्डिनांड मार्कोस, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९८२ : श्रिया शरण, तमिळ चित्रपट अभिनेत्री.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १६८० : गो-मिझुनू, जपानी सम्राट.
  • १८८८ : दॉमिंगो फॉस्तिनो सार्मियेंतो, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९२१ : सुब्रमण्य भारती, तमिळ कवी.
  • १९४८ : मुहम्मद अली जीना, पाकिस्तानचे संस्थापक.
  • १९५० : यानी स्मट्स, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.
  • १९७१ : निकिता ख्रुश्चेव, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९७३ : साल्वादोर अयेंदे, चिलीचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९७३ : नीम करोली बाबा, भारतीय गुरू.
  • १९७८ : जॉर्जी मार्कोव्ह, बल्गेरियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९८७ : महादेवी वर्मा, हिंदी कवयित्री.
  • १९९३ : अभि भट्टाचार्य, चित्रपटसृष्टीतील अभिनेते
  • १९९८ : एन. डी. नगरवाला, क्रीडा संघटक व शिक्षणमहर्षी.
  • २००१ : सप्टेंबर ११च्या दहशतवादी हल्ल्यांचे बळी.
  • २००२ : जॉनी युनिटास, अमेरिकन फुटबॉल खेळाडू.


No comments:

Post a Comment