Saturday 7 March 2015

8th March 1673 Chhatrapati Raje Shivaji Maharaj Conquered Panhala Fort


पन्हाळा

पन्हाळा
Teen darwaza panhala.jpg
तीन दरवाजा येथील आतील द्वार, इ.स.१८९४,पन्हाळा
नावपन्हाळा
उंची४०४० फूट
प्रकारगिरीदुर्ग
चढाईची श्रेणीसोपी
ठिकाणकोल्हापूरमहाराष्ट्र
जवळचे गावकोल्हापूर
डोंगररांगकोल्हापूर
सध्याची अवस्थाव्यवस्थित
स्थापना{{{स्थापना}}}
पन्हाळगड
पन्हाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तसेच पन्हाळा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य गाव आहे.
पन्हाळगड हा कोल्हापूर भागातील महत्त्वाचा किल्ला आहे. पन्हाळ्याला पर्णालदुर्ग देखील म्हणतात. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २ जानेवारीइ.स. १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१]

भौगोलिक स्थान[संपादन]

आधुनिकदृष्ट्या थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला तसा निसर्गनिर्मित आहे. कोल्हापूरच्या वायव्येस १२ मैलावर समुद्रसपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आणि कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर आहे.

इतिहास[संपादन]

पन्हाळ्याला साधारण १,२०० वर्षांचा इतिहास आहे.हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव पन्नग्नालय होते.
मार्च २ १६६० ला किल्ल्यास सिद्दी जौहरचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरून विशाळगडाकडे निसटले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू देशपांडे होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी बनून व बाजी प्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले.
१६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून शिवाजीने परत किल्ला ताब्यात घेतला. पुढे १७१० मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली व नंतर १८४४ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

कसे जाल ?[संपादन]

नकाशा
चार दरवाजा मार्गे कोल्हापूर शहरातून "एस टी' बसने किंवा खाजगी वाहनाने थेट
किल्ल्यावर जाता येते. ही वाट चार दरवाजा मार्गे गडात प्रवेश करते. तीन 
दरवाजा मार्गे गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाजातून जातो. हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे .

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे[संपादन]

  • राजवाडा- हा ताराबाईचा वाडा होय. वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज यात नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉइज हॉस्टेल आहे.
  • सज्जाकोठी- राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते. याच इमारतीस संभाजी राजांना शिवाजी महाराजांनी या प्रांताचा कारभार पाहण्यास ठेवले होते. शिवरायांच्या गुप्त खलबते येथेच चालत.
  • राजदिंडी-ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवाजीमहाराज सिद्दी जौहरचा वेढ्यातून निसटले. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले.
  • अंबरखाना- अंबारखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला. याच्या सभोवती खंदक आहे येथेच गंगा ,यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्य कोठारे आहेत. यात वरी, नागली आण भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. याशिवाय सरकारी कचेर्‍या, दारुगोळ्याची कोठारे आणि एक टाकसाळ होती.
  • चार दरवाजा- हा पूर्वेकडील अत्यंत मोक्‍याचा व महत्त्वाचा दरवाजा होय. इ.स १८४४ मध्ये हा इंगज्रांनी पाडून टाकला. थोडे भग्नावशेष आज शिल्लक आहेत. येथेच "शिवा काशीद' यांचा पुतळा आहे.
  • सोमाळे तलाव - गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. ह्या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्त्र मावळ्यांनी लक्ष्य चाफ्यांची फुले वाहिली होती.
  • रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी - सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची.
  • रेडे महाल- याच्याच बाजूला एक आडवी इमारत दिसते त्यास रेडे महाल म्हणतात.वस्तुतः ही पागा आहे. मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणत.
  • संभाजी मंदिर- त्याच्यापुढे ही एक छोटी गढी व दरवाजा आहे हे संभाजी मंदिर आहे.
  • धर्मकोठी- संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते ती धर्मकोठी सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करत.
  • अंदरबाव- तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची, काळ्या दगडांची वास्तू दिसते. ही वास्तू तीन मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे, तर मधला मजला हा चांगला ऐसपेस आहे. त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा दिसतो.
  • महालक्ष्मी मंदिर- राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे. राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय.
  • तीन दरवाजा- हा पश्‍चिमेकडील सर्वात महत्त्वाचा दरवाजा. दरवाज्यावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. इ.स १६७६ मध्ये कोंडाजी फर्जंदने येथूनच अवघ्या ६० मावळ्यानिशी किल्ला जिंकला.
  • बाजीप्रभूंचा पुतळा- एस टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभू देशपांडे ह्यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे.

गडावरील राहायची सोय[संपादन]

किल्ल्यावर राहण्यासाठी निवासस्थाने, हॉटेल्स आहेत.

गडावरील खाण्याची सोय[संपादन]

जेवणाची सोय निवासस्थानांमध्ये होते.

मार्ग[संपादन]

जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन]

कोल्हापूर मार्गे गाडी रस्त्याने १ तास लागतो.

छायाचित्रे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. वर उडी मारा "कोल्हापूर डिस्ट्रिक्ट, इन्व्हेन्टरी ऑफ मॉन्यूमेन्ट्स" (इंग्रजी मजकूर). आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल१२ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले.

संदर्भ[संपादन]

पन्हाळा - विकिपीडिया

  1. mr.wikipedia.org/wiki/पन्हाळा
     
    Baji Prabhu Deshpande Statue in Panhala Fort.jpg · Panhala fort arches.jpg · Panhala fort ruins.jpg · Panhala fort entrance.jpg · Insite Panhala fort.jpg · Panhala ...

Panhala Fort - Wikipedia, the free encyclopedia

  1. en.wikipedia.org/wiki/Panhala_Fort
     
     या पानाचे भाषांतर करा
    Panhala fort (also known as Panhalgad, Pahalla and Panalla (literally "the home of serpents")), is located in Panhala, 20 kilometres northwest of Kolhapur in ...

पन्हाळगड किल्ला | Panhalgad Fort - मराठीमाती

  1. www.marathimati.net/panhalgad-fort/
     
    २६ फेब्रु, २०११ - पन्हाळगड किल्ला Panhalgad Fort – ४००० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. कोल्हापूर ...

information on Panhala - Maharashtra Tourism

  1. www.maharashtratourism.gov.in/.../For...
     
     या पानाचे भाषांतर करा
    Panhala or Panhalgarh, about 19kms north-west of Kolhapur, is possibly the largest and most important fort of the Deccan. Roughly triangular in shape, the hill ...

Trip to Panhala fort. - YouTube

  1. www.youtube.com/watch?v=FhM_BOsOnok
     
    १६ ऑक्टो, २०११ - CoffeeKatta द्वारा अपलोड केलेले
    Trip to Panhala fort (20km from Kolhapur). ... Shivneri Fort - Birthplace of Chattrapati Shivaji Maharaj.wmv ...

Panhala Fort - YouTube

  1. www.youtube.com/watch?v=nlp9RB1n-GI
     
    ४ ऑग, २०१३ - ajinkya bandbe द्वारा अपलोड केलेले
    Panhala or Panhalgarh, about 19kms north-west of Kolhapur, is possibly the largest and most important fort ...

Kolhapur- Panhala Fort - Kolhapur Tourism

  1. www.kolhapurtourism.org/kolhapur-pa...
     
     या पानाचे भाषांतर करा
    Panhala lies on the Sahyadri Mountain Range and is situated in the Kolhapur district of Maharashtra.

Panhala Fort - Panhala Fort Kolhapur Maharashtra India

  1. www.maharashtratourism.net/forts/pan...
     
     या पानाचे भाषांतर करा
    Panhala fort is located in Kolhapur district of Maharashtra.

Panhala Fort, Kolhapur - TripAdvisor

  1. www.tripadvisor.in/Attraction_Review-...
     
     या पानाचे भाषांतर करा
    Panhala Fort, Kolhapur: See 71 reviews, articles, and 48 photos of Panhala Fort, ranked No.3 on TripAdvisor among 31 attractions in Kolhapur.

हेसुद्धा पाहा[संपादन]


No comments:

Post a Comment